मुंबई : लोकेश राहुलची भारताच्या टी-२० संघात एंट्री होईल, अशी आशा सर्वांनाच होती. कारण यष्टीरक्षण आणि सलामीची जबाबदारी राहुल हा नेहमीच पार पाडतो. त्याचडबरोबर राहुलकडे क्रिकेटचा चांगला अनुभवही आहे. पण तरीही त्याची भारताच्या टी-२० वर्ल्ड कपच्या संघात निवड झाली नाही. पण राहुलची भारतीय संघात का निवड झाली नाही, याचे खरे कारण आता निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे.
राहुलने भारताचे कर्णधारपदही भूषवले आहे. भारतीय संघासाठी राहुल एक महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे भारताच्या संघात त्याला नेहमीच संधी दिली जाते. पण यावेळी मात्र जेव्हा टी-२० वर्ल्ड कपचा संघ निवडला गेला, तेव्हा त्याला मात्र संधी मिळाली नाही. हा चाहत्यांसाठीही एक धक्का होता. पण राहुलची फक्त एका कारणामुळेच भारताच्या टी-२० संघात का निवड करण्यात आली नाही, असे आगरकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
राहुलबाबत आगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, ” लोकेश राहुल हा एक दर्जेदार खेळाडू आहे. त्याच्या गुणवत्तेबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. आयपीएलमध्ये तो सलामीला येऊन फलंदाजी करत आहे. ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्याचबरोबर संजू सॅमसन हा मधल्या फळीत कोणत्याही स्थानावर येऊन फलंदाजी करू शकतो. आम्हाला मधल्या फळीत येऊन फलंदाजी करणारा खेळाडू हवा होता. निवड करताना आम्ही खेळाडूंच्या स्थानाबद्दलही विचार केला. त्यामुळेच आम्ही लोकेश राहुलची निवड करू शकलो नाही, हे एकमेव कारण आहे. पण राहुल हा एक दमदार खेळाडू आहे, याबद्दल आमच्या कोणाचेही दुमत नव्हते.”
Related News
IND vs ENG ODI Series : धक्कादायक! भारताविरुद्ध इंग्लंडचा 'हा' खेळाडू तिन्ही वनडेत NOT OUT; 249 धावांनी मालिकेचा खरा गेमचेंजर
मुंबई : भारत आणि इंग्...
Continue reading
IND vs ENG 3rd ODI मध्ये भारताच्या Playing XI मध्ये तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर असून केएल राहुल, अर्शदीप...
Continue reading
आयसीसीने 2027 वनडे वर्ल्ड कप आणि 2028 टी-20 वर्ल्ड कपच्या फॉरमॅटमध्ये मोठे बदल केले आहेत. 'सुपर सेवन', 'सुपर टेन' आणि एलिमिनेटर सामने यामुळे स्पर्धा अधि...
Continue reading
IND vs ENG 1st ODI : 125 धावांचे वादळी शतक झळकवूनही ईशान किशन Playing 11 मधून बाहेर; जाणून घ्या 5 मोठी कारणे
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्य...
Continue reading
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 4-0 ने व्हाईटवॉश झाल्यानंतर माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी टीम इंडियाच्या संघनिवडीवर गंभीर प्रश्न उपस्थित...
Continue reading
आकृती अग्रवालने पृथ्वी शॉसोबतच्या साखरपुड्याच्या अफवांवर अखेर मौन सोडले. इन्स्टाग्राम पोस्ट नेमकी कोणासाठी होती, साखरपुडा मोडला का, काय आहे संपूर...
Continue reading
Rajkummar Rao As Sourav Ganguly : जबरदस्त फर्स्ट लूक रिव्हील! 'दादा'च्या बर्थडेला चाहत्यांना मोठं सरप्राइज, जाणून घ्या 7 खास गो...
Continue reading
अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जदरान यांचे वयाच्या 38 व्या वर्षी HLH या दुर्मिळ आजारामुळे निधन झाले. भारताविरुद्ध सेहवाग आणि गंभीरला बाद क...
Continue reading
इंग्लंडने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 4 विकेट्सने पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जेकब बेथेलची शानदार खेळी, भारतीय गोलंदाजीचा फ्लॉप शो आणि सो...
Continue reading
पृथ्वी शॉ-आकृती अग्रवालचे नाते तुटले? 'विश्वासघात' पोस्ट, फोटो डिलीट आणि अनफॉलोनंतर चर्चांना उधाण
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्ल...
Continue reading
IND vs SL Test Series 2026: इंग्लंड दौऱ्यानंतर भारताचा श्रीलंका दौरा, BCCIने जाहीर केले 2 कसोटी सामन्यांचे वेळापत्रक
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आणि...
Continue reading
लोकेश राहुल हा भारताचा भविष्यातील कर्णधार असल्याचे म्हटले जात होते. पण यावेळी तर टी-२० वर्ल्ड कपच्या संघातच त्याला संधी मिळालेली नाही. त्यामुळे यापुढेही तो भारताच्या टी-२० संघात नसेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे यापुढे राहुल हा फक्त भारताच्या कसोटी आणि वनडे संघातच पाहायला मिळू शकतो.
सध्या राहुल लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. पण या आयपीएलमध्ये त्याला अजूनही छाप पाडता आलेली नाही.