अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोविड-19 ची लागण झाल्यामुळे
त्यांच्यावर अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेण्याचा दबाव वाढला आहे.
प्रभावशाली डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी
Related News
ॲडम शिफ यांनी सार्वजनिकपणे जो बायडेन यांना अध्यक्षपदाची उमेदवारी सोडून देण्याचे आवाहन केले आहे.
काँग्रेसमधील सर्वात ज्येष्ठ डेमोक्रॅट सिनेटचे नेते चक शूमर यांनी म्हटले होते की
बायडेन यांनी संबंधित आरोग्य समस्या लक्षात घेऊन
त्यांची निवडणूक मोहीम संपवली तर ते देश आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी चांगले होईल.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाने जो बायडेन यांना उभे केले आहे.
दरम्यान, मिलवॉकी येथील रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये ट्रम्प आणि
उपाध्यक्षपदाचे उमेदवार जे.डी. वन्स यांनी मतदारांना नवीन मार्ग निवडण्याचे आवाहन केले.
वन्स यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषा वन्स यांनी परिषदेत त्यांची ओळख करून दिली.
डोनाल्ड ट्रम्प आज रात्री परिषदेला संबोधित करणार आहेत.
5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत
डोनाल्ड ट्रम्प यांचा सामना जो बायडेन आणि
जे.डी. वन्स यांचा सामना उपाध्यक्ष कमला हॅरिसशी होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/manorama-khedkar-who-came-after-ias-puja-got-stuck/