शासनाने वान धरणातील पाणी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर
महापालिकेने ‘अमृत अभियान’च्या टप्पा-२ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी
Related News
कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त**
अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे
अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे.
ग्रा...
Continue reading
अकोला प्रतिनिधी | ४ एप्रिल २०२५
अकोल्याच्या कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. काल (३ एप्रिल) अकोल्याचे
तापमान ४३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते.
मात्र आज (४ एप्रिल) तापम...
Continue reading
पातूर तालुका प्रतिनिधी | माझोड
राज्य महामार्ग क्रमांक २८४ वरील माझोड - बाभुळगाव रस्त्याचा कि.मी. ५२ ते ६५ दरम्यानचा भाग अत्यंत खराब
झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या
NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
भा...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी) –
"सहकारातून समृद्धी" ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना देशातील सहकारी चळवळीला
गतिमान करण्यासाठी असून तळागाळातील लोकांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून आर्थिक प्र...
Continue reading
पातूर (तालुका प्रतिनिधी) –
सावता परिषदेच्या पातूर तालुकाध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड नुकतीच करण्यात आली
असून त्यांना नियुक्ती पत्र देऊन औपचारिक नियुक्ती देण्यात आली.
अजय ढोणे ह...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील एका ३४ वर्षीय युवक शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे
शेवटी जीवनयात्रा संपवण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला.
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
तयार केलेला ७३६ कोटींचा ‘डीपीआर’ रखडला होता.
शासनाच्या सुकाणू समितीने पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्याचे निर्देश दिल्यानंतर
मनपाने बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव धरणातून पाणी आरक्षणासाठी धावाधाव सुरू केली होती.
अखेर विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाने
जिगाव प्रकल्पातून २४.१३ दलघमी जलसाठ्याच्या आरक्षणावर
२० जून रोजी शिक्कामोर्तब केले.
यासंदर्भात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर
यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पत्रव्यवहार केला होता.
शासनाच्या निर्णयामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
अकोलेकरांना दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी
‘अमृत अभियान’ अंतर्गत केंद्र व राज्य शासनाने सन २०१७ मध्ये
११० कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता.
या निधीतून हद्दवाढ़ क्षेत्र वगळता शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचे
सुमारे ४४५ किमीचे जाळे बदलणे तसेच आठ जलकुंभ उभारण्याचा समावेश होता.
संबंधित कंत्राटदाराने आठपैकी सात जलकुंभांचे काम पूर्ण केले असून
आठवा जलकुंभ अद्यापही उभारला नाही.
यादरम्यान, मनपाने ‘अमृत अभियान’च्या टप्पा-२ अंतर्गत
प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नागपूर येथील
पुराणिक ब्रदर्स एजन्सीची नियुक्ती केली.
२०१७ मध्ये मनपाने शहराची सन २०५५ पर्यंतची
संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून वान धरणातून
२४ दलघमी जलसाठ्याचे आरक्षण निश्चित केले होते.
तेल्हारा येथील शेतकऱ्यांचा विरोध पाहता
तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारच्या कालावधीत
पाणी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती.
ही स्थगिती कायम असताना मनपाच्या निर्देशानुसार
पुराणिक ब्रदर्स एजन्सीने वान धरणातील २४ दलघमी पाणी आरक्षण
गृहीत धरून तब्बल ७३६ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला होता.
या अहवालाला राज्याच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली होती.
परंतु या धरणातील प्रस्तावित पाणी आरक्षणाला
तत्कालीन शासनाने स्थगिती दिली असतानाही
‘डीपीआर’ तयार करण्याच्या मनपाच्या भूमिकेवर
सुकाणू समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत
पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते.
सुकाणू समितीच्या निर्देशानंतर मनपा प्रशासनाने
बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तालुक्यात असलेल्या ‘जिगाव’ प्रकल्पातून
४८ दलघमी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे सादर केला होता.
परंतु आरक्षणाच्या मुद्यावर पाटबंधारे बोट ठेवत हा प्रस्ताव बाजूला सारला.
अखेर या संदर्भात आ. रणधीर सावरकर यांनी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला.
त्यानंतर शासनाने २४.१३ दलघमीच्या जलसाठ्याला मंजूरी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/gurugram-sfotani-haadrale-fire-fighting-machine-manufacturing-factory-burnt-to-ashes/