बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गटग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या
ग्राम जनूना (पुनर्वसन) येथील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत,
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
मनसे तालुका अध्यक्ष सचिन पाटील गालट
व मनविसे चे तालुका अध्यक्ष वैभव पाटील कोहर यांच्या नेतृत्वात
अनेक ग्रामस्थांनी स्वतःला मातीत गाडून घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे,
तर रोशन जाधव, दीपक खराटे, सरपंच नितीन वाकोडे, सचिन पाटील चांभारे,
विकी लहरिया, अमर उमक, ग्राम पंचायत सदस्य ईश्वर वाळेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आंदोलन करत आहेत.
रस्त्यासंबंधी संबंधीत अधिकारी जोपर्यंत लेखी स्वरूपात
कामाबद्दल माहिती देऊन काम सुरु होत नाही
तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
जनुना गावातून जाणारा मुख्य रस्ता
अर्थात महान पातूर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याची पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्ता प्रलंबित असून
येथील नागरिकांना ये जा करण्याकरीता नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
रस्त्याची चाळणी झाल्यामुळे रस्ता अपघातांना निमंत्रण देत असतो,
अश्या परिस्थितीत जीवित हानी होण्याचे नकारता येत नाही.
काही महिन्यांअगोदर मुर्तिजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार
यांनी सदर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून गावात फलक लावले
मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरले आहेत.
गावातली नागरिकांसह परिसरातील शेकडो नागरिकांनी आता हा रस्ता रोखून धरला आहे.
यांच्या मागणीची दखल घेत प्रशासन यावर तोडगा काढेल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/this-is-the-time-for-you-and-me-to-come-together/