जामठी बु.:150 वर्षांपासून आषाढ उत्सवाची परंपरा कायम

जामठी बु

जामठी बु.:स्थानिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मुर्तींची

प्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास दिडशे वर्ष झालीत.

तेंव्हापासून आषाढी उत्सव आणि दहीहंडीची परंपरा जामठी बु. या गावात चालु आहे.

Related News

एकादशीनिमित्त सकाळी दरवर्षीप्रमाणेच तिर्थकलश स्थापन करण्यात आला.

या प्रसंगी पुजारी वासुदेव गावंडे, ह भ प गजानन उमाळे,

सौ. उमाळे, पुरुषोत्तम महाराज बोळे, साहेबराव बोळे,

शंकर दाते, डिगांबर चतुरकर, गंगाबाई वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर दिवसभर विविध भजनीमंडळांचे भजनांचे कार्यक्रम झालेत.

ह भ प रमेशराव श्रीराव यांचे तर्फे दर्शनार्थींना दिवसभर चहा व फराळ देण्यात आला.

दुपारी 3 ते 4 ह भ प पुरुषोत्तम महाराज बोळे यांचे प्रवचन झाले.

सायंकाळी सहा ते आठ हरिपाठाचा कार्यक्रम झाला.

रात्री 10 ते 12 भजनाचा कार्यक्रम झाला.

दिनांक 22 ला दुपारी 4 वा. गावातून ‘श्री ‘च्या पालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.

गोपाळपुरीवर पुजा, आरती करून दहीहंडी फोडण्यात आली.

पुन्हा मंदिरात जागेवर मिरवणूक आल्यानंतर आरती करुन दहहंडी फोडण्यात आली.

त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

दिनांक 23 ला ह भ प वासुदेव गावंडे यांचे मार्गदर्शनात प्रक्षाळ पुजा करण्यात येऊन समारोप करण्यात आला.

Read also: https://ajinkyabharat.com/lives-of-passengers-saved-due-to-alertness-of-bus-driver/

Related News