“जय ज्योती, जय क्रांती!” च्या जयघोषाने दुमदुमले मूर्तिजापूर शहर

भव्य शोभायात्रेतील झाक्या

भव्य शोभायात्रेतील झाक्या ठरल्या लक्षवेधी

प्रतिनिधी / मूर्तिजापूर

स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मूर्तिजापूर शहरात

भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. “जय ज्योती, जय क्रांती!” च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.

Related News

माळीपुरा येथून सुरू झालेल्या या शोभायात्रेत महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित विविध झाक्यांनी जनतेचे विशेष लक्ष वेधले.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत प्रशांत शेलवंटे तर सावित्रीबाई फुले यांच्या

भूमिकेत सौ. शेलवंटे यांनी समर्पक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

शोभायात्रा माळीपुरा, टांगा चौक, मोरारजी चौक, भगतसिंग चौक मार्गे स्टेशन

भागातील छत्रपती शिवाजी महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, मठ्ठा, आईस्क्रीम आदींची उत्तम सोय करण्यात आली होती.

संपूर्ण शोभायात्रा शांततापूर्ण वातावरणात पार पडली.

या शोभायात्रेचे आयोजन क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते.

या प्रसंगी समस्त समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भव्य आयोजनातून फुलेंच्या विचारांचा जागर आणि नव्या पिढीला सामाजिक समतेचा संदेश दिला गेला.

Related News