Indrajit Sawant Threat : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरची धमकी?

Indrajit Sawant Threat : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरची धमकी?

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकऱणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

नागपुरातील प्रशांत कोरटकर याने इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकरच्या मोबाईल सीडीआरवरून

Related News

इंद्रजीत सावंत यांना त्यानेच धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीकडून इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

इंद्रजीत सावंत यांनी स्वतः हा आरोप केला होता.

याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी प्रशांत कोरटकर याचा सीडीआर काढणार असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी ही नागपुरातूनच देण्यात आल्याचे समोर येत आहे.

इतकंच नाहीतर ही धमकी प्रशांत कोरटकर याच्या नंबरवरून गेली होती, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

या प्रकरणात आवाज मार्फ केल्याचा दावा करत प्रशांत कोरटकर याने करत आरोप फेटाळून लावले होते.

मात्र तो दावा खोटा असल्याचे दिसून येत आहे. प्रशांत कोरटकर याच्या तपासासाठी आता नागपूर पोलीस,

कोल्हापूर पोलीस पथकं शोध घेत आहेत. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरनंतर आता नागपुरातही गुन्हा दाखल झाला आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/c-shewati-matoshrichaya-dararatch-yal-sanjay-rautancha-gesture/

 

 

Related News