नवी दिल्ली, दि. ९ मे : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच सोशल मीडियावर दिशाभूल
करणाऱ्या आणि खोट्या माहितीचा मारा सुरू आहे. भारताच्या सैन्याविरोधात विविध फेक व्हिडिओ आणि चुकीचे दावे पसरवले जात असून,
त्यामागे नियोजनबद्ध अपप्रचाराचा डाव असल्याची शक्यता आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
PIB फॅक्ट चेक टीमकडून या सर्व दाव्यांची तथ्य पडताळणी करण्यात आली असून,
बहुतांश व्हिडिओ आणि माहिती खोटी असल्याचे सिद्ध झाले आहे.
उदाहरणार्थ, भारतीय सैनिक युद्ध सुरू होताच त्यांच्या पोस्टवरून पळून जात
असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मात्र PIB फॅक्ट चेकनुसार, तो व्हिडिओ एका खाजगी प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा असून,
भारतीय लष्कराशी त्याचा कोणताही संबंध नाही. विद्यार्थी भारतीय सैन्यात निवड झाल्याच्या आनंदाने भावुक झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
त्याचप्रमाणे, भारतीय महिला पायलट स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंग पाकिस्तानकडून पकडण्यात
आल्याचा दावा काही सोशल मीडिया हँडल्सवरून करण्यात आला. पण PIB फॅक्ट चेक टीमने स्पष्ट केले की, हा दावा पूर्णपणे खोटा आहे.
जयपूर, श्रीनगर विमानतळ, ननकाना साहिब गुरुद्वारा, दिल्ली-मुंबई हवाई मार्गांवरील स्फोट किंवा सेवा बंदी
अशा एकूणच अफवांची मालिकाच सोशल मीडियावर फिरत आहे.
पण या सर्व दाव्यांचा कुठलाही अधिकृत आधार नाही, असे सरकारच्या अधिकृत माहिती तपासणी यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
पीआयबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही फेक पोस्ट,
व्हिडिओ किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत सरकारी स्रोतांवरूनच माहिती मिळवा आणि अफवांचा प्रसार टाळा.
Read Also : https://ajinkyabharat.com/baluchistankadoon-pakistan-and-chinala-thet-gesture/