भारताने वस्त्रोद्योग क्षेत्रात निर्माण केला दबदबा

भारताचे जागतिक व्यापारामध्ये विविध धान्य आणि उत्पादनामध्ये

वर्चस्व आहे. जागतिक व्यापारामध्ये आता भारताने बांग्लादेशला

चांगलाच धक्का दिला आहे. बांग्लादेशात सुरू असलेल्या राजकीय

Related News

संकट आणि सत्तापालटानंतर उद्भवलेली स्थिती यामुळे त्या देशाचे

नुकसान झाले आहे; मात्र याकाळात व्यापाराच्या दृष्टीने भारताचा

फायदा झाला आहे. जगभरामध्ये वस्त्रोद्योगासाठी बांगलादेश

प्रसिद्ध आहे; मात्र तेथील परिस्थितीचा फटका त्या देशाला बसला

आणि भारताला त्याचा प्रचंड फायदा झाला आहे. नुकत्याच जाहीर

करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय वस्त्रोद्योगाने तेजी

पकडली आहे, हे स्पष्ट होत आहे. आज, १७ ऑक्टोबर २०२४ रोजी

वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, जागतिक पातळीवर

अनिश्चितता असूनही, आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील एप्रिल ते

सप्टेंबर या दरम्यान देशाची वस्त्र निर्यात ही ८.५ टक्क्यांनी वाढून

७.५ अब्ज डॉलर भारतीय रुपयांमध्ये सुमारे ६० हजार कोटी रुपये

झाली आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात, सूती कापड, फॅब्रिक्स, मेड-अप

आणि हातमाग उत्पादनांमध्ये ०.७९ टक्क्यांची माफक वाढ झाली

असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ते ५.९४६

अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. मानवनिर्मित सूत, फॅब्रिक्स आणि

मेड-अपची शिपमेंट २.९५ टक्क्यांनी वाढून २.४०५ अब्ज झाली,

तर कार्पेट निर्यात ११.४१ टक्क्यांनी वाढून ७४५.७४ दशलक्ष डॉलर

झाली. याच आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्येही तयार कपड्यांची

निर्यात १७.३ टक्क्यांनी वाढून १.११ अब्ज डॉलरवर पोहोचली

आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये, निर्यात २.९२३ अब्ज डॉलर इतकी

होती. कापड निर्यात ९.५६ टक्क्यांनी वाढून १.८१३ अब्ज डॉलर

झाली आहे, जी गेल्या वर्षी सप्टेंबर २०२३ मध्ये १.६५५ अब्ज

होती. कपड्यांच्या शिपमेंटमध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये ९४६.३५

दशलक्ष डॉलरच्या तुलनेत १७.३० टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली,

एकूण १.११० अब्ज कापड निर्यात अंतर्गत फॅब्रिक्स, मेड-अप

आणि हातमाग उत्पादने ३.४८ टक्क्यांनी वाढून १,०५३.१९ दशलक्ष

झाली, तर मानवनिर्मित सूत, फॅब्रिक्स आणि मेड-अप्सची निर्यात

११.४१ टक्क्यांनी वाढून ४१५.२८ दशलक्ष झाली. कार्पेट निर्यातीत

१४.९३ टक्क्यांनी वाढ होऊन ती १८०.३८ दशलक्षवर पोहोचली.

जागतिक व्यापार संघटनेने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला

२०२५ मध्ये जागतिक व्यापाराचा वाढीचा अंदाज ३.३ टक्क्यांवरून

३ टक्क्यांपर्यंत कमी केला होता. पश्चिम आशियामधील सुरु

असलेल्या वाढत्या संघर्षामुळे, ज्यामुळे व्यापारासाठी महत्त्वाचा

असणारा लाल समुद्र हा जवळजवळ १ वर्षासाठी रोखला गेला

आहे. त्यामुळे व्यापारावर खूप मोठ्या प्रमाणात याचा परिणाम

होऊ शकतो.

Read also: https://ajinkyabharat.com/priyanka-gandhi-destroying-the-future-of-bjp-youth/

Related News