Raj Thackeray : “चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचेत”; राज ठाकरेंचा शिक्षणमंत्र्यांवर सणसणीत टोला, सभागृहात एकच हशा
मनविसेच्या मेळाव्यातRaj Thackeray यांची सरकारवर जोरदार टीका; चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून साधला निशाणा, तरुणांना दिला मोठा संदेश
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार, शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या प्रश्नांवर सडेतोड भाष्य केले. आपल्या खणखणीत आणि उपरोधिक शैलीत बोलताना त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अलीकडील वक्तव्यावर जोरदार टीका केली. CJP च्या जंतरमंतर आंदोलनादरम्यान दगडांवरील फिंगरप्रिंटच्या आधारे आरोपींची ओळख पटवून ती आधारशी लिंक करण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी उपहासात्मक टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
राज ठाकरे म्हणाले की, “दगडांवरचे फिंगरप्रिंट तपासणार म्हणतात, पण मला आधी चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचे आहेत.” त्यांच्या या वाक्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा आणि हास्याचा कडकडाट केला. यावेळी त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्रासारख्या राज्यातील शिक्षण आणि तंत्रज्ञान खात्याच्या प्रमुखांकडून अधिक जबाबदार भूमिका अपेक्षित असल्याचे सांगितले.
“डोक्याला तेल लावलं, पण बुद्धी आली नाही”; Raj Thackeray ची उपरोधिक टीका
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात लहानपणीचे उदाहरण देत चंद्रकांत पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, “आम्ही लहान असताना आई-वडील सांगायचे की, रात्री झोपताना डोक्याला तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. पण एका माणसाने आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं, तरी बुद्धी आली नाही.”
Related News
‘मी विसरायला लागलो…’ भाषणात अमित ठाकरे अचानक ब्लँक; स्टेज सोडून 10 मिनिटांनी केले पुनरागमन
मोदी-शाहांवर संजय राऊतांचा घणाघात; “2029 पूर्वीच सत्ता हादरेल”
UPSC चा पेपर कधी फुटत नाही, मग NEETचाच का?; सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल
“भक्त बनू नका, मोकळ्या मनाने विचार करा”; गावी पोहोचताच सोनम वांगचुक यांचा मोठा संदेश
Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल; 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?
CWG 2026 : भारताची एका दिवसात 6 पदकांची कमाई; अस्मिता डेचा इतिहास, नीरज चोप्राला रौप्य
Gen Z ला आवडणाऱ्या एनर्जी ड्रिंकवर सरकारचा मोठा निर्णय; आता बदलणार बाटल्यांवरील लेबल
यावरच न थांबता त्यांनी पुढे म्हटले, “प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. हे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. जग कुठे चाललं आहे आणि हे काय बोलत आहेत? दगडावरील फिंगरप्रिंट आधारशी लिंक करणार म्हणतात. हे ऐकून आश्चर्य वाटतं.”
राज ठाकरे यांनी पुढे कोल्हापूरचा उल्लेख करत म्हटले, “कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून पुण्यात पाठवलं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. पण तिथेही काही झालं नाही. अशा प्रकारची वक्तव्ये करणारे शिक्षणमंत्री असतील तर जेन-झी पिढीचा संताप होणारच.”
जेन-झी पिढीला समजून घेण्याचे आवाहन
मनविसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी तरुणाईशी थेट संवाद साधत नव्या पिढीच्या मानसिकतेवर भाष्य केले. ते म्हणाले की, आजची जेन-झी पिढी केवळ मुंबई, पुणे किंवा दिल्लीपुरती मर्यादित नाही. 1997 नंतर जन्माला आलेली अनेक मुलं ग्रामीण महाराष्ट्रातही आहेत आणि त्यांच्या अपेक्षा, स्वप्नं आणि समस्याही वेगळ्या आहेत.
“इंग्रजी बोलणारेच जेन-झी नसतात. ग्रामीण भागातील तरुणांनाही समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या आकांक्षा काय आहेत, त्यांना काय हवं आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. जुन्या विचारांमध्ये अडकून राहून चालणार नाही,” असे ते म्हणाले.
त्यांनी मनविसेच्या कार्यकर्त्यांनाही या नव्या पिढीशी सातत्याने संवाद साधण्याचे आवाहन केले. विद्यार्थी संघटनांनी केवळ आंदोलनांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“टेलिग्रामपासून इन्स्टाग्रामपर्यंतचा काळ आम्ही पाहिला”
आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, त्यांनीही विद्यार्थी सेनेतूनच राजकारणाची सुरुवात केली. “काम करत, शिकत आणि घडत आम्ही इथपर्यंत आलो. आजचा काळ पूर्णपणे बदलला आहे. आम्ही टेलिग्रामपासून इन्स्टाग्रामपर्यंतचा प्रवास पाहिला. आजची विद्यार्थी पिढी तंत्रज्ञानाच्या नव्या युगात जगते. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे आणि अपेक्षांकडेही नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.
मनविसेच्या नव्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास व्यक्त करत त्यांनी संघटनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
सरकारवरही साधला निशाणा
Raj Thackeray यांनी आपल्या भाषणात केवळ चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली नाही, तर राज्यातील शिक्षण व्यवस्थेपासून ते प्रशासनाच्या कामकाजापर्यंत अनेक मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची टीका त्यांनी केली.
त्यांच्या मते, सरकारने तरुणांच्या रोजगार, शिक्षण, कौशल्यविकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. केवळ वादग्रस्त वक्तव्ये करून किंवा चर्चेत राहण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार नाहीत, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला.
Raj Thackeray यांच्या या भाषणातील चंद्रकांत पाटील यांच्यावरील टीका, जेन-झी पिढीबाबतचे निरीक्षण आणि शिक्षण व्यवस्थेवर केलेले भाष्य याची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या उपरोधिक शैलीतील वक्तव्यांमुळे मेळाव्यात अनेकदा हास्याचे वातावरण निर्माण झाले, तर सरकारवरील त्यांच्या टीकेमुळे राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
