Uddhav Thackeray : इकडे ठाकरेंच्या हस्ते ‘शिवबंधन’ पुस्तकाचं प्रकाशन, तिकडे शिवबंधन सोडून दहा जणांचा ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश
Related News
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
दुपारी दोननंतर जीएमसी औषध वितरण विभागाचे गेटबंदशरद शेगोकार
अकोला : जिल्ह्यातील गावागावातून ६० ते ७० किलोमीटर प्रवास करून गोरगरीब रुग्ण अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात...
Continue reading
शरद शेगोकारअकोला : आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्यातील निर्देशांक मूल्यांकनात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवलेल्या अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती म...
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे मोठा झटका बसला
पक्षाच्या दहा माजी नगरसेवकांनी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये पालिकेच्या माजी सभापती, माजी सभागृह नेत्यांचा समावेश आहे. हा प्रवेश सोहळा मुंबईत ‘वर्षा’
निवासस्थानी शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.
कालच्या दिवसात ठाकरेंचे सहा खासदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा असतानाच संभाजीनगरमध्ये मात्र खरोखर धक्का बसला.
संजय शिरसाट यांचा ठाकरे गटाला झटका
छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला हादरा देऊन, माजी महापौर,
शिवसेना ठाकरे पक्षाचे मराठवाडा सचिव व काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला
पश्चिम मतदारसंघात पक्ष संघटनेची स्थिती भक्कम करण्याचा शिरसाट यांनी प्रयत्न केला
ठाकरेंचे दहा माजी नगरसेवक शिवसेनेत
मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी ठाकरे पक्षाला धक्का दिला. या मतदारसंघातील ठाकरे पक्षाचे दहा माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले.
या वेळी खासदार संदीपान भुमरे, शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत, हृषीकेश जैस्वाल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विश्वनाथ राजपूत यांनी प्रवेश सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
शिवबंधन सोडणाऱ्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश?
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये स्थायी समितीचे माजी सभापती मोहन मेघावाले, माजी सभागृह नेते किशोर नागरे यांचा समावेश आहे.
माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल, रूपचंद वाघमारे, स्वाती नागरे, ज्योती वाघमारे, मीना गायके, ज्योती पिंजरकर, सीमा खरात यांनीही शिवसेनेत प्रवेश केला
इकडे ‘शिवबंधन’चं प्रकाशन, तिकडे ‘वर्षा’वर पक्षप्रवेश
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘शिवबंधन’ या
कार्यअहवालाचे प्रकाशन मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत असतानाच ‘वर्षा’ बंगल्यावर ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत होता.
Read more here: https://ajinkyabharat.com/delhi-election-result-2025-delhi-mussalimbhul-matdarsanghat-bjp/