सांगली : विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाही, हे 4 जूनला कळेल. त्यांनी जर चंद्रहार पाटलांना विजयी केलं तर नक्कीच आम्ही कदमांना वाघाची पदवी देऊ, असा खोचक टोला संजय राऊतांनी विश्वजीत कदम यांना लगावला आहे. संजय राऊत सांगलीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सांगलीचा वाघ कोण? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सांगलीत वसंतदादा पाटील हे वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहिलेले आहेत. वाघाची रचना आणि स्वभाव वेगळा असतो. विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल. त्यांनी जर चंद्रहार पाटलांना विजयी केलं तर नक्कीच आम्ही कदमांना वाघाची पदवी देऊ. अशा अनेक वाघांनी चंद्रहार पाटलांना विजयी केलं पाहिजे. मग आम्ही 4 जूनला त्या वाघांचा जाहीर सत्कार करू. जयंत पाटीलांची डरकाळी ही वाघाची डरकाळी आहे. सांगलीमध्ये मला बरेच वाघ दिसत आहेत, त्या वाघाचं जतन करणं गरजेचं आहे.
अनेक कमजोर उमेदवार अनेक पक्षांनी अनेक ठिकाणी उभे केलेत, ते कमजोर वाटत असले तरी आम्ही त्यांचा प्रचार करतंच आहोत ना, आम्ही तो कमजोर आहे म्हणून सांगत नाही, आम्ही वाघ आहेत आम्ही त्याला पुढे घेऊन जाऊ. त्या उमेदवाराला विजयी करणं शिवसेना म्हणून आमची जबाबदारी आहे.’ अशी भावना देखील राऊतांनी व्यक्त केली आहे.
Related News
शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; ‘लाडक्या भावां’मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा
मी शहाबाज बोलतोय, मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देऊ, पाकिस्तानी नंबरवरुन धमकी, पोलिस अलर्ट
मातोश्रीवर धूमधडाक्यात प्रवेश, शिवसेनेला नडले, सहाच महिन्यात ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याची भाजपात घरवापसी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान, म्हणाले, आमच्या सरकारने ज्या बाबी…
माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अण्णा हजारेंच्या मागणीवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले…
आमचा देवेंद्र अत्यंत मितभाषी; कार्यकर्त्याला मारहाण, मोहोळांचा संताप, पत्नीसह जोग कुटुंबाच्या घरी भेट
कोकणात ठाकरेंना धक्क्यावर धक्के, विनायक राऊतांच्या कट्टर समर्थकाने साथ सोडली, राणेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील; संजय राऊत यांचा घणाघात
आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी…, रावसाहेब दानवेंची पुन्हा जीभ घसरली, म्हणाले सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती
साळवींपाठोपाठ कोकणातील ठाकरे गटाच्या दुसऱ्या मोठ्या नेत्याकडून खंत व्यक्त, संजय राऊत म्हणाले…
नाशिकच्या सिंहस्थ कुंभ मेळा आयोजनावरुन महायुतीत कोल्ड वॉर, आज एकनाथ शिंदेंची स्वतंत्र बैठक
दिल्लीत ऑपरेशन टायगर, डिनर डिप्लोमसीतून शिंदे गटाचं उद्धव सेनेला खिंडार? श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यावर ठाकरेंचे खासदार
सांगलीच्या संदर्भात माझी राहुल गांधींशी चर्चा झालेली आहे. विशाल पाटील यांच्यासंदर्भात दिल्लीतील नेत्यांशी चर्चा झालेली आहे. माझ्या पद्धतीने मी चर्चा करतो, अशी माहिती देत सांगत सांगलीतील तिरंगी लढतीबाबत राऊत म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार आहेत सांगलीत. एका उमेदवाराचा प्रचार स्वत: भाजपा करतंय तर दुसऱ्या बाजूला प्रचार करण्यासाठी काही लोक नेमलेत. तरी भाजपाच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील करतील.’
मोदींच्या ठाकरेंविषयीच्या वक्तव्यावर प्रहार करत राऊत म्हणाले की, ‘मोदी स्वत: अडचणीत आहेत, त्यामुळे अडचणीत असलेला व्यापारी हा नेहमी खोटं बोलत असतो. जर ठाकरेंबदल प्रेमाचा बाणा असता तर मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव एका बेईमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं. मोदींचं शिवसेनेवरचं प्रेम खोटं आहे.’