नागपूर : फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यासाठी ब्लॅकमेल करून सायबर गुन्हेगारांनी औषध विक्रेत्या महिलेचे बँक खाते, एटीएम व सिमकार्डचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेने नागपूर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांनी जेम्स व जॉन जलालुद्दीन या दोघांविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
५२वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.
Related News
सुमारे 1.25 लाख पॅरासिटामोल टॅबलेट माघारी; FDA च्या गुणवत्ता चाचणीत फेल, दोन सरकारी रुग्णालयांमध्ये खळबळ
FDA : वापरल्या जाणाऱ्या टेल्मिसार्टन 40 मिलीग्रॅम या औषधांच्या नमुन्यांमध्...
Continue reading
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
Continue reading
नितीन गडकरींचं मोठं विधान; ‘आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला पाहिजे’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू ...
Continue reading
Devendra Fadnavis चा रामजन्मभूमी आंदोलनाचा थरारक अनुभव; ‘माझ्यावर गोळीबार झाला, लाठीचार्ज झाला, 18 दिवस जेलमध्ये होतो’
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यात विद्यार्थिनींशी सं...
Continue reading
अभिजीत दिपके, आदित्य ठाकरे यांचे फोटो फडणवीसांनी व्यासपीठावर लावले पाहिजेत; राऊतांचा खोचक टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात ‘जेन झेड’ अर्थात तरुण पिढीसोबत संवाद साधणार...
Continue reading
साखरेचे भाव वाढले; चहाचा कपही महागला, जिलेबी-मिठाईसह गोड पदार्थांच्या दरात वाढ होणार
सकाळची सुरुवात असो किंवा दिवसभराच्या धावपळीतला छोटासा ब्रेक… चहाचा एक कप हा सर्वसामान्यांच्या ...
Continue reading
नागपुरातील 12 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; पोलीस अलर्ट, पालकांमध्ये भीतीचं वातावरण
नागपूर : नागपुरात मंगळवारी सकाळी एकाच वेळी तब्बल 12 शाळांना धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने मोठी खळ...
Continue reading
नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोठी फिल्डिंग; रविंद्र चव्हाणांचा 2 दिवसांचा विदर्भ दौरा
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय ...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक...
Continue reading
गारपिटीचे मोठे संकट! ताशी 70 ते 75 किमी वेगाने वारे, मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना अलर्ट
Weather Update : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यां...
Continue reading
नोकरीसाठी पोर्तुगालला गेली, तिथे जाताच विकून टाकलं; लैंगिक छळ, मारहाण अन् धमक्या, नागपूरच्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार
परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाला भुलून अनेक तरुण-तरु...
Continue reading
AI च्या मदतीने स्मार्ट शेती! 25% खर्च कमी, 30% उत्पादन वाढीचा दावा; शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा खास मंत्र
नागपुरातील कार्यक्रमात AI आधारित शेतीचा रोडमॅप...
Continue reading
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे औषधविक्रीचे दुकान असून, तिचा पती मराठवड्यातील बँक ऑफ बडोद्यात वरिष्ठ व्यवस्थापक आहे.
नोव्हेंबर २०२२मध्ये महिलेला आंतरराष्ट्रीय कॉल आला. तुमचे सोन्याचे पार्सल असून, त्यासाठी ३५ हजार रुपये द्यावे लागतील’, असे सांगण्यात आले.
महिलेने सायबर गुन्हेगाराच्या खात्यात ३५ हजार रुपये जमा केले. त्यानंतर वेळोवेळी गुन्हेगाराने पैशांची मागणी केली.
औषध विक्रेत्या महिलेने एकूण दीड लाख रुपये जमा केले. मात्र, त्यांना सोन्याचे पार्सल मिळाले नाही.
त्यानंतर डिसेंबर महिन्यात विल्यियम पर्सी याने महिलेच्या व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला.
फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
त्यानंतर त्यानेही महिलेची १२ लाख ७९ हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मार्च २०२३मध्ये स्टार मेकर अॅपवर महिलेची जेम्स याच्यासोबत ओळख झाली.
महिलेने जेम्सला फसवणूक झाल्याची माहिती दिली. त्यानेही पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर दोघे सतत व्हॉट्सअॅपवर चॅट करायला लागले.
एटीएम अडकल्याने माझा पगार थांबवला आहे. तुमचे एटीएम व सिमकार्ड द्या, मी तुम्हाला मदत करेल’, असे आमिष जेम्सने दाखविले.
महिलेने नवीन सीमकार्ड खरेदी करून बेस्यातील स्टेट बँक ऑफ इंडियात खाते उघडले.
नंतर महिलेने सायबर गुन्हेगाराने दिलेल्या दिल्लीतील पत्त्यावर पॅनकार्ड, आधारकार्ड, एटीएम कार्ड, सिमकार्ड व दोन छायाचित्रे पाठविली.
याचा वापर करून जेम्स व जॉन जलालुद्दीन या दोघांनी सायबर फसवणुकीची रक्कम महिलेच्या बँक खात्यात जमा करून ती अन्यत्र वळवली.
असा उघडकीस आला गैरवापर
महिलेला १ एप्रिल रोजी बेंगळुरू पोलिसांनी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली. त्यामुळे महिला घाबरली. त्यानंतर ती बेंगळुरू पोलिस ठाण्यात गेली.
जेम्सने अशाचप्रकारे अनेक महिला व पुरुषांच्या खात्याचा वापर करून फसवणुकीचा पैसा त्यांच्या खात्यात जमा करून काढल्याचे महिलेला कळाले.
महिलेने अलीकडेच अजनी पोलिस ठाण्यात झालेल्या जनता दरबारात पोलिस सहआयुक्त अस्वती दोरजे यांच्याकडे तक्रार केली.
दोरजे यांच्या आदेशानंतर अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.