नवी दिल्ली | प्रतिनिधी —
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदलाचे अधिकारी
लेफ्टनंट विनय नरवाल (वय 26) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, विनय नरवाल यांचा केवळ
Related News
माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना आग, परिसरात घबराट – अग्निशमन यंत्रणांचा वेळेत प्रतिसाद
मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्...
Continue reading
सकाळी पाणी पिण्याच्या सवयीवर सावधगिरीची गरज – योग्य पद्धत महत्त्वाची
आजकाल आरोग्यविषयक चर्चेत सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याची सवय खूप चर्चेत ...
Continue reading
बदलत्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहायचे असेल तर आहारात ‘या’ 5 गोष्टींचा नक्की करा समावेश! तज्ञांचा सल्ला
आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीत प्रत्येका...
Continue reading
सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांसाठी खरेदीचा 'गोल्डन' दिवस – आजचा दर जाणून घ्या
भारतात सोने म्हणजे फक्त दागिने नव्हे, तर परंपरा, विश्वास आणि गुं...
Continue reading
होर्मुझ खाडीत भारतीय जहाजांवर पाकिस्तानी झेंडे? सोशल मीडियावरील दाव्यावर भारत सरकारचे स्पष्ट उत्तर; अफवांना फाटा!
इराण–अमेरिका युद्धस्थिती दिवसेंदिवस चिघळत असताना जगातील सर्वात मह...
Continue reading
धमकी, भीती आणि लैंगिक शोषण…! Ashok Kharat चा ‘भयानक चेहरा’ उघड – SIT च्या तपासाने खळबळ
राज्यभराला हादरवून सोडणाऱ्या भोंदू Ashok Kharat प्रकरणात त...
Continue reading
मुंबईत बिबट्याचा थैमान! मालाडमध्ये रहिवासी सोसायटीत बिबट्या शिरला; नागरिकांमध्ये भीतीचे सावट
राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे समोर आले आहे. मालाड पूर्...
Continue reading
लाहोरी पनीर रेसिपी: खास पंजाबी फ्लेवरने भरलेली समृद्ध डिश, घरच्या घरी बनवा अवघ्या ३०-४० मिनिटांत!
भारतीय पाककृतींच्या विश्वात पनीरच्या डिशेसची कमतरता नाही. कढई पनीर, पनीर बिर्याणी...
Continue reading
“Red Flags” म्हणून पाहिल्या जाणाऱ्या 3 सवयी, ज्या तुम्हाला प्रत्यक्षात अधिक चांगला माणूस बनवतात – मानसशास्त्र काय सांगते?
समाजात “Red Flags” म्हणजे...
Continue reading
मानसशास्त्र सांगते: हे १८ साधे सवयी तुम्हाला क्षणात आकर्षक बनवू शकतात!
आकर्षक दिसणे म्हणजे फक्त सुंदर चेहरा, परफेक्ट केस किंवा ठराविक शरीरयष्टी नव्हे. मानसशास्त्रानुसार खरी आकर्षक...
Continue reading
ट्रम्प यांच्या अल्टिमेटमदरम्यान जागतिक तणाव वाढला; ब्रेंट क्रूड $111 पार, तेलाच्या किमतींनी मारला उंच झेप
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या...
Continue reading
भारतामध्ये Gratuity वर कितीपर्यंत करमुक्त रक्कम मिळू शकते? जाणून घ्या महत्वाची माहिती
भारतामध्ये Gratuity हा कर्मचारीांना त्यांच्या दीर्घ आणि सातत्य...
Continue reading
आठ दिवसांपूर्वीच हिमांशी नरवाल यांच्यासोबत विवाह झाला होता.
हनीमूनसाठी युरोपला जाण्याचा प्लॅन असतानाही वीजा न मिळाल्याने त्यांनी काश्मीरचा पर्याय निवडला होता.
21 एप्रिल रोजी नवविवाहित दाम्पत्य काश्मीरमध्ये दाखल झाले होते आणि दुसऱ्या दिवशी
त्यांनी पहलगाम येथील हॉटेलमध्ये चेक इन केले. 22 एप्रिलला बैसरन व्हॅली या मिनी स्वित्झर्लंड म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनस्थळी ते फिरण्यासाठी गेले असताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला.
हिमांशी नरवाल यांनी हल्ल्यानंतर दिलेल्या जबाबात सांगितले की, “मी आणि माझे पती विनय भेलपुरी खात होतो,
तेव्हा एक व्यक्ती आला आणि म्हणाला – ‘हा मुस्लिम नाही’ आणि लगेच गोळी झाडली.”
विनय यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. हिमांशी यांना दहशतवाद्यांनी काही इजा केली नाही.
विनय नरवाल हे हरियाणातील करनाल शहरातील सेक्टर 7 येथे राहणारे होते.
ते इंजिनीअरिंग पदवीधर असून तीन वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय नौदलात प्रवेश केला होता.
सध्या ते केरळच्या कोची येथे कार्यरत होते.
त्यांचे वडील राजेश कुमार हे पानिपत येथील कस्टम्स विभागात सुपरिटेंडंट पदावर कार्यरत आहेत.
आई आशा देवी या गृहिणी आहेत, तर बहिण सृष्टि नरवाल दिल्लीमध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करत आहे..
विनय यांचे आजोबा हवा सिंह हे हरियाणा पोलिस दलात कार्यरत होते आणि 2004 साली सेवानिवृत्त झाले.
नवविवाहित आयुष्य सुरू करण्याआधीच आयुष्य संपलेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हळहळला आहे.
देशासाठी समर्पित एक उमदा युवा अधिकारी एका भ्याड हल्ल्यात शहीद झाला असून त्यांच्यावर अंतिम संस्कार सैन्यविधीने करण्यात येणार आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/srinagarhun-yenyasathi-aircraft-tikitancha-dar-tippat/