विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
धारगड (ता. अकोट) — तालुक्यातील आदिवासीबहुल धारगड पुनर्वसित गावाजवळील खासबाग
शेतशिवारात मजुरी करणाऱ्या चंद्रकला किसन डाखोरे (वय 55) या वयोवृद्ध महिलेस शिवपूर येथील सुमित
Related News
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
सुनील डवंगे (वय 18) या तरुणाने प्राणघातक हल्ला करून, तिचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
घटना मंगळवारी सकाळी 11 ते 11.30 दरम्यान घडली.
चंद्रकला डाखोरे संत्रा बागेत मजुरीचे काम करत असताना, सुमित डवंगे तिथे आला व ‘आबा कुठे आहेत?’
अशी विचारणा करू लागला. मात्र, आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून, त्याने मागून येत चंद्रकलावर हल्ला चढवला.
तिच्या तोंडाला आणि गळ्याला रुमालाने आवळत, जबरदस्तीने तिला जमिनीवर पाडले आणि लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.
हल्ल्यानंतर आरोपीने तिचे सुमारे 33 हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे पोत,
पाटल्या चोरल्या आणि घटनास्थळावरून फरार झाला.
महिला गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडली. गावकऱ्यांनी तातडीने तिला अकोट
ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले, जिथे तिने आपबीती सांगितली.
प्राथमिक उपचारांनंतर तिला अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले,
मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अकोला येथे हलवण्यात आले आहे.
या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी IPC कलम 309 (6) अंतर्गत गुन्हा दाखल करत,
आरोपी सुमित डवंगे यास अटक केली आहे.
पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/honeymunasathi-europala-janar-vinay-aani-himanshi/