मे महिना संपून पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असतानाही मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावातील नाल्यांचे उपसण अद्याप झालेले नाही.
परिणामी ठिकठिकाणी नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत असून,
त्यामध्ये दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
Related News
Unique Wedding : आधुनिक काळात नात्यांच्या संकल्पना झपाट्याने बदलत आहेत आणि त्याचाच एक अनोखा नमुना थायलंडमधील एका विवाहातून समोर आला आहे. Thailan...
Continue reading
बिग बॉस मराठी ६ : विशालचा खेळ बदलला, रेवाची एंट्री आणि रुचितासोबत तणावाची स्थिती
“मी तिला पटवणार” – विशालच्या रणनीतीमुळे घरात वाढले नातेवाईकांच्या गोंधळाचे सावट
कलर्स मराठीनं नुक...
Continue reading
संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी; मध्य पूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला
सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली, मात्र संरक्षण क्...
Continue reading
T20 World Cup 2026: भारताकडून पराभवाने पाकिस्तानला मोठा झटका; खेळाडूंवर ठोठावला 50 लाखांचा दंड
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कठोर निर्णय – खराब कामगिरीला आता मोठी किंमत
Continue reading
अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, जगभरात तणाव
अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले
इस्रायल आणि अमेरिका यांनी ...
Continue reading
होळी 2026: रंगाच्या आनंदात गॅझेट सुरक्षित ठेवण्यासाठी 10 वॉटरप्रूफ गॅझेट्स
होळी म्हणजे आनंद, उत्साह आणि रंगांचा उत्सव
Continue reading
‘The 50’: सिवेत टोमरने वंशज सिंगला मागितली माफी; म्हटले, “तुला दुख झालं असेल, त्याबद्दल खरोखरच माफी”
रिऐलिटी शो The 50 प्रेक्षकांच्या मनावर राज करत आहे...
Continue reading
EPFO अपडेट 2025-26: नोकरदारांसाठी मोठी बातमी! पीएफवर 8.25% व्याजदर कायम
देशातील 7.5 कोटी नोकरदारांसाठी महत्त्वाची घोषणा
Continue reading
अमेरिकेचे तीन एफ-15 फायटर जेट इराणने नाही, तर कुवेतच्या एअर डिफेन्सने चुकून पाडले
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात मोठा ट्विस्ट सम...
Continue reading
धक्कादायक! इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
मध्य-पूर्वेत तणाव उफाळला; अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष भयंकर स्वरूपात
मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा भयंकर तणाव उभ...
Continue reading
मुख्य रस्त्यांवरून घाण पाणी वाहत असल्यामुळे गावातील लहान मुले, वृद्ध, महिलांना रोजच्या हालचालींसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शाळा,अंगणवाडी, देवस्थान परिसरातसुद्धा हीच अवस्था दिसून येते.
ग्रामस्थांनी अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी रोज या रस्त्यांवरून ये-जा करतात, पण त्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांच्या मनात रोष निर्माण झाला आहे.
“निवडणुकीच्या काळात आश्वासनांची भरमसाठ वचने देणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर
मात्र गावकऱ्यांच्या समस्या ऐकण्यास तयार नसतात,” असा आरोप ग्रामस्थांकडून होतो आहे.
गाव विकासासाठी कोणतेही ठोस नियोजन किंवा कृती होताना दिसत नाही.
विकासाची मोठी स्वप्ने दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गावातील मूळ गरजा – नालेसफाई, स्वच्छ पाणी, रस्ते आणि सार्वजनिक दिवाबत्ती – या
प्राथमिक बाबींवर देखील काम होत नसल्याने, ग्रामस्थांच्या संतापाला उधाण आले आहे.
“गावाला स्मार्ट बनवण्याची क्षमता आपल्यात नाही , पण कमीत कमी मुलभूत गरजा तरी पूर्ण करा,” अशी माफक अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-daambi-gavat-acute-panitancha-citizen-zp-ceo-office/