Mumbai Heat Waves : मुंबईकरांवर यंदा उष्णतेचा मारा होण्याची चिन्हं आहेत.
मार्च आताच कुठे सुरू झाला असतानाच तापमान उच्चांकावर पोहचले आहे.
तापमानाने 38 अंशाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सलग दोन महिन्यात सूर्य देव मुंबईकरांची परीक्षा घेण्याची शक्यता आहे.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
मुंबईकरांना यंदा उष्णतेच्या लाटेला तोंड देण्याची वेळ येणार आहे.
मार्च आताच कुठे सुरू झाला असतानाच तापमान उच्चांकावर पोहचले आहे.
तापमानाने 38 अंशाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सलग दोन महिन्यात सूर्य देव मुंबईकरांची परीक्षा घेण्याची शक्यता आहे.
मागील पूर्ण फेब्रुवारी महिन्यात उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केले. आता संपूर्ण राज्यात मार्च आणि मे महिन्यात
उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता अधिक राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
फेब्रुवारीतच मुंबईकरांना आलर्म
नुकताच संपलेला फेब्रुवारीचा पूर्ण महिना सरासरी पेक्षा उष्ण ठरला आहे.
देशात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान 27.58 अंश सेल्सिअस असते, मात्र यंदा ते 29.7 अंश सेल्सिअस राहिले आहे.
किमान तापमान सेल्सिअस असते ते 15.2 अंश सेल्सिअस होते. सरासरीपेक्षा कमाल तापमान 1.49 तर कीमान
तापमान 1.20 असं सेल्सिअस ने जास्त होते. 1901 पासूनच्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी दुसर्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे.
2023 च्या फेब्रुवारीत 29.44°c नोंद झाली होती. त्यामुळे येत्या दोन महिन्यात उष्णतेच्या
झळांनी मुंबईकरांना घामाच्या धारा लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या तीन दिवसात घामाच्या धारा
मुंबईकर उष्ण हवामानामुळे हवालदिल झाले आहेत. मागील तीन दिवस तापमानाचा
पारा 38 अंशावर नोंदविला जात होता. मात्र शुक्रवारी तापमानात काहीशी घट झाली .
सांताक्रुज येथे 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान ही घट काही दिवस कायम राहील
असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबई सह राज्यभरातील नागरिकांनी
मार्च आणि मे महिन्यात उष्णतेपासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असे अहवान ही करण्यात आले आहे.
पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तापमानात वाढ
दरम्यान मुंबई पाठोपाठ पुण्यातील तापमानात सुद्धा हळूहळू वाढ होत आहे. पुण्यात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे.
दिवसभर निरभ्र आकाशामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दुसरीकडे नाशिकसह छत्रपती संभाजीनगर,
अकोला आणि नागपूरमध्ये सुद्धा तापमान वाढीला सुरुवात झाली आहे. विदर्भासह मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात तापमान वाढ जाणवत आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/indrajit-sawant-threat-history-practice-indrajit-sawant-yana-prashant-koratkarchi-threatened/