हेमंत सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ !

मनी

मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगातून बाहेर आलेल्या हेमंत सोरेन यांनी

गुरुवारी झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी चंपाई सोरेन यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते.

Related News

सोरेन यांचे वडील आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सुप्रीमो शिबू सोरेन,

त्यांची आई रुपी सोरेन, पत्नी कल्पना सोरेन आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील

आघाडीचे वरिष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना २८ जून रोजी

झारखंड उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.

आंचल जमीन घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.

१३ जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती.

त्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल गेल्या आठवड्यात जाहीर केला.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडची सूत्रं

हाती घेतील अशी चर्चा सुरू झाली होती, जी आता खरी ठरत आहे.

चंपई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत सोरेन

आता झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Read also: https://ajinkyabharat.com/hathras-bargadya-tutun-pulfat-ghuslya/

Related News