कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान

कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान

निरीक्षण अधिकारी पुरवठा बार्शीटाकळी यांचे संकल्पनेतून रास्त भाव धान्य दुकानदार नेहमी कार्डधारकांच्या रोशाला

बळी पडायचे आणि त्यामुळे त्यांना शासन स्तरावून त्रास होत होता. परंतु आता संगणकीय प्रणालीमुळे

शासनास सर्वमाहिती एका ठिकाणी समजने सोपे झाले त्यामुळे शासनाने जून महिन्यात तिनं महिन्याचे

Related News

धान्य वाटपास दिले आणि याची सर्वस्वी जबाबदारी आनंद गुप्ता निरीक्षण अधिकारी यांचेकडे सोपवण्यात आली होती.

त्यामुळे त्यांनी शासनाचे आदेशानुसार तालुक्यातील सर्व दुकानदारांना वाटपसंदर्भात कडक निर्देश दिले होते.

त्यामुळे काही कर्तव्यदक्ष दुकानदारांनीसुद्धा मेहनत घेउन शर्थीचे प्रयत्न करून कार्डधारकांना विना विलंब विहित

मुदतीत वाटप शंभरटक्के पूर्ण केले. त्यामुळे आनंदजी गुप्ता निरीक्षण अधीकारी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र येन्नावार यांना पाचारण

करून बार्शीटाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सभागृहात सभेचे आयोजन केले होते. सदर सभेमध्ये सुनीता कोरे, फैझान पठाण,

विष्णू लोखंडे, सुरेंद्र चव्हाण, रामेश्वर चोपडे,शेख जमीर,ईश्वर राऊत, प्रवीण बुलबुले,आनंद सुरडकर,धर्मवीर गवई, कैलास जाधव,

अशोक लोनाग्रे,एम.एम. हुसेन इत्यादी कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा शासना चे उद्दिष्ट विहित कालावधीत

पुर्ण केलेल्याना जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे हस्ते सन्मानाने प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

तेव्हा उर्वरित दुकानदारांनी उद्दिष्ट पुर्ण करण्याचे ठरविले,सदर सभेच्या अध्यक्ष स्थानी तहसीलदार राजेश वझीरे होते,

तर प्रमुख उपस्थित जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र येन्नावार,आनंदजी गुप्ता, ए. एस. सोनवणे, अतुल नागे,सचिन काळे,

महादेव देवलुले नासीर खान,वशीम खान, राजेश सिरसाट, सुरेंद्र चव्हाण पत्रकार व एम एम हुसेन उपस्तिथ होते.

सर्व प्रथम हिच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे सदर प्रार्थनेने कार्यक्रमाचीं सुरवात करण्यात आली.

त्या नंतर उपस्थित मान्यवरंचा सत्कार करण्यात आला,प्रास्ताविक आनंद गुप्ता यांनी केले तसेच सोनवणे,

नागे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि प्रमुख मार्गदर्शन रवींद्र येन्नावार व राजेश वझीरे यांनी तर सूत्रसंचालन

महादेव लुले यांनी केले.आभार ईश्वर राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील रास्त भाव दुकानदार उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/gandhigram-yehe-kavad-yatre-poor-district-magistrate-and-police-superintendent/

Related News