गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार

गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार

अकोला | प्रतिनिधी

अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदारांनी गंभीर गैरव्यवहाराचे आरोप करत मोठा गोंधळ घातला.

जुन्या शहरातील शाखेत आज सकाळपासूनच शेकडो ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी मोठी गर्दी केली होती.

Related News

ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार, संस्थेतील लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा संशय असून, व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

अनेक ठेवीदारांनी वारंवार चकरा मारूनही ठेवी परत न मिळाल्याने अखेर सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

व्यवस्थापकांविरोधात संताप

ठेवीदारांनी आरोप केला की, बँकेचे व्यवस्थापक व संबंधित अधिकारी रक्कम मागणाऱ्या नागरिकांना हाकलून लावत आहेत.

काहींना धमकावल्याचेही सांगण्यात येत आहे. परिणामी ठेवीदारांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

 “थोड्या-थोड्या प्रमाणात पैसे देऊ” – व्यवस्थापक

दरम्यान, पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी “सर्वांना एकदम पैसे देता येणे शक्य नाही,

थोड्या-थोड्या प्रमाणात परतावा केला जाईल,” असे सांगत मोठ्या प्रमाणात एकाच

वेळी परतावा मागण्यात आल्याने अडचण निर्माण झाली आहे, असे स्पष्ट केले.

 पुढील कारवाईकडे लक्ष

सध्या ही तक्रार सहकारी उपनिबंधक कार्यालयात पोहोचली असून, याप्रकरणी आर्थिक तपास

व कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आपली मेहनतीची रक्कम अडकलेले नागरिक मानसिक तणावात असून,

सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/shawcha-first-blissful-day/

Related News