पालकमंत्री संजय राठोड यांना बहिणींची राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी

पालकमंत्री संजय राठोड यांना बहिणींची राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी

पालकमंत्री संजय राठोड यांना बहिणींची राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी

यवतमाळ प्रतिनिधी

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना रक्षाबंधनानिमित्त

Related News

राखी बांधण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो बहिणींनी शनिवारी दुपारी बचत भवन, बळीराजा चेतना

अभियान सभागृहात मोठी गर्दी केली. जिल्हाभरातून आलेल्या बहिणींनी पालकमंत्र्यांना राखी बांधून ओवाळणी केली.

संजय राठोड हे गेल्या २५ वर्षांपासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करत असून दरवर्षी शेकडो भगिनी त्यांना राखी बांधण्यासाठी येतात.

यंदाही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राखी बांधल्यानंतर पालकमंत्री राठोड यांनी सर्व बहिणींना साडीचोळी भेट देत ओवाळणी दिली.

या वेळी शिवसेनेचे पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे, संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, जिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, राजूदास जाधव, यशवंत पवार, महिला आघाडी संपर्क प्रमुख कालिंदा पवार, संघटिका वैशाली

मासाळ आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व महिला आघाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्षाबंधनाचा हा सोहळा स्नेह, आपुलकी आणि पालकमंत्री संजय राठोड यांना बहिणींची राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी दृढ करणारा ठरला.

Read also :https://ajinkyabharat.com/washim-polysancha-teas-tasant-parakram-jabri-theft-karanari-toi-gajad/

Related News