कोरोना महामारीनंतर आता जपानमध्ये एका दुर्मिळ आजाराने थैमान घातले आहे.
हा आजार इतका घातक आहे,
Related News
की याची लागण ज्या व्यक्तीला झाली
त्याचा मृत्यू निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम या नावाने ओळखला जाणाऱ्या या आजाराने
एखाद्याला ग्रासले तर, ४८ तासांत त्या व्यक्तीचा मृत्यू होत आहे.
हा आजार मांस खाणाऱ्या जिवाणूमुळे पसरत आहे.
जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीजच्या आकडेवारीनुसार,
देशात या वर्षी जवळपास याची हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत,
जी गेल्या वर्षीच्या एकूण संख्येपेक्षा जास्त आहेत.
स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस जिवाणूमुळे होणारा
गंभीर संसर्गजन्य आजार आहे. हे जीवाणू शरीरात विषारी पदार्थ तयार करतात,
ज्यामुळे शरीरात तीव्र वेदना जाणवतात.
हे जीवाणू रक्तप्रवाहात आणि अवयवांमध्ये सहज प्रवेश करू शकतात,
ज्यामुळे अल्प कालावधीत एकापेक्षा जास्त अवयव निकामी होतात.
स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोमच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये
ताप, स्नायू दुखणे आणि उलट्या यांसारखी लक्षणे जाणवतात.
जसजसा शरीरात या जिवाणूंचा प्रभाव वाढतो तसतसे घातक लक्षणे दिसू लागतात.
कमी रक्तदाब, सूज, नेक्रोसिस (हाडांमधील ऊती (टिश्यू) नष्ट होणे),
अवयव निकामी होणे, यांसारखी लक्षणे जीवघेणी ठरू शकतात.
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन नुसार,
उपचार करूनही हा आजार प्राणघातक असू शकतो.
स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम असणा-या १० लोकांपैकी
तीन लोकांचा संसर्गामुळे मृत्यू होतो.
२ जूनपर्यंत जपानच्या आरोग्य मंत्रालयाने या आजाराची एकूण ९७७ प्रकरणे नोंदवली,
ज्यांचा मृत्यू दर ३० टक्क्यांपर्यंत आहे.
जानेवारी ते मार्च दरम्यान ७७ लोकांचा
मांस खाणाऱ्या जिवाणूंच्या संसर्गामुळे मृत्यू झाला.
मागील वर्षी या आजाराने बाधित झालेल्या ९४१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
मात्र, सध्या जपानमध्ये या आजाराची परिस्थिती पाहता
मागल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची संख्या दिसून येणार असल्याचे
तज्ज्ञांचे सांगणे आहे.
१९९९ मध्ये या आजाराचे निदान झाले होते,
तेव्हापासून यावर्षीची आकडेवारी सर्वाधिक आहे.
गेल्या वर्षी, या आजारामुळे ९७ मृत्यूची नोंद करण्यात आली होती,
जी गेल्या सहा वर्षांतील मृत्यूची दुसरी सर्वाधिक संख्या आहे.
टोकियो वुमेन्स मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक केन किकुची
यांनी या जिवाणूंच्या वाढत्या संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केली.
बहुतेक रुग्णांचे मृत्यू सुरुवातीची लक्षणे दिसल्याच्या ४८ तासांच्या आत होतात.
कोविड-१९ नंतर लोकांच्या कमकुवत झालेल्या
रोगप्रतिकारक शक्तीमुळे प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते,
असे त्यांनी सांगितले.
आरोग्यविषयक तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी सांगितले की,
हे जीवाणू शरीरात विषारी पदार्थ तयार करतात,
ज्यामुळे शरीरात जळजळ होऊ लागते.
त्यानंतर हे जीवाणू शरीरातील ऊतींचे नुकसान करतात,
ज्यामुळे शरीरावर सूज येते आणि तीव्र वेदना होतात.
डिसेंबर २०२२ मध्ये, पाच युरोपीय देशांमध्ये स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोमची
अनेकांना लागण झाली होती.
या पाच देशांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, आयर्लंड, नेदर्लंड आणि स्वीडनचा समावेश होता.
या आजाराचा १० वर्षाखालील मुलांमध्ये
सर्वात जास्त प्रभाव दिसून आला होता.
मार्चमध्ये जपानी अधिकाऱ्यांनी या आजाराच्या प्रकरणांमध्ये
वाढ होण्याचा इशारा दिला होता.
या प्रकरणांची संख्या जुलै २०२३ पासून वाढली आहे,
विशेषतः ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये
या जिवाणूचा संसर्ग होत आहे.
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने असे नमूद केले आहे की,
खुली जखम असलेल्या वृद्ध लोकांना हा आजार होण्याचा धोका जास्त आहे.
उदाहरणार्थ, अलीकडे शस्त्रक्रिया झालेल्या वृद्ध नागरिकांना.
परंतु, या वर्षी प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सीडीसीने आपल्या वेबसाइटवर सांगितले की,
हा आजार झालेल्या जवळपास निम्म्या लोकांच्या शरीरात
जीवाणू कसे आले याची अद्याप तज्ज्ञांना माहिती नाही.
हे जीवाणू जगात थैमान घालणार?
सध्या या जिवाणूंचा उद्रेक जपानमध्ये झाला असला
तरी आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे हे जीवाणू जगभरात पसरण्याची शक्यता आहे.
हा आजार टाळण्यासाठी स्वच्छता राखणे,
नियमित हात धुणे आणि त्वचेला कोणतीही दुखापत झाल्यास
त्वरित उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
अचानक तीव्र वेदना, ताप आणि जखमेच्या ठिकाणी
लालसरपणा यांसारखी लक्षणे जाणवल्यास
त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे.
Read also : सगळ्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या- रवी राणा (ajinkyabharat.com)