नवी दिल्ली, ८ मे २०२५ – देशातील सद्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये
आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना एक महत्त्वाचे पत्र पाठवले आहे.
या पत्रात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचा आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
Related News
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा अकोला दौरा; अकोट येथे विवाह समारंभास उपस्थिती
संशयास्पद माहितीवर विश्वास ठेवू नका;
सराफा दुकानात पुन्हा ‘बंटी-बबली-आजी’ टोळीचा हात;
अकोल्यातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात मोठा खुलासा; किरीट सोमय्यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
चेन चोरी करणाºया महिलेला सहा तासात केली अटक
मान्सून लवकर येणार! महाराष्ट्रात १० जूननंतर पावसाची शक्यता
भारतीय सेनेला विराट कोहलीचा सलाम
सायरन कधी वाजतो? – हवाई हल्ल्याच्या धोक्यावेळी नागरिकांना मिळतो किती वेळ वाचण्यासाठी?
जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे आवाहन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही दलप्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक;
चंदीगड-अंबालात हवाई हल्ल्याचा इशारा
गृह मंत्रालयाकडून पाठवलेल्या पत्रात गरज पडल्यास तातडीने आपत्कालीन सामुग्री खरेदी
करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच नागरी संरक्षण कायदा १९६८ मधील कलम ११ अंतर्गत
आपत्कालीन अधिकारांचा वापर करून नागरिकांचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या कार्यवाहीसही अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पाकिस्तान सीमेवरील आणि देशातील महत्त्वाच्या
विमानतळांवरील सुरक्षेचा आढावा घेतला. या हालचाली युद्धजन्य वातावरणात देशाची अंतर्गत तयारी अधिक बळकट करण्याच्या दिशेने असल्याचे स्पष्ट होत आहे.
गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, स्थानिक प्रशासनाने नागरी सुरक्षेची उपाययोजना राबवताना मॉक ड्रिल, सायरन
प्रणाली, ब्लॅकआउट, आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांचे नियोजन यावर भर द्यावा. यामुळे युद्धजन्य किंवा
नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांचे प्राण आणि मालमत्तेचे रक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chen-stealing/