सगळ्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या- रवी राणा

लोकसभा निवडणुक

पत्रकार परिषद घेत पत्नीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशासह राज्यात

भाजप आणि महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश न आल्याचे बघायला मिळाले आहे.

Related News

अशातच राज्यात बहूचर्चित असलेल्या अमरावती मतदारसंघात देखील

महायुतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना त्यांच्या दारुण पराभवाला समोर जावे लागले आहे.

आज अमरावतीत नवनीत राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेतली.

“पराभवाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो.

तसेच पराभवाची कारणे शोधण्यासाठी आम्ही विश्लेषण सुरू केले असून पुढे आत्मचिंतन करू”,

अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

निवडणूक काळात आपल्याच लोकांनी आपला घात केला.

तसेच सगळ्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या,

असा आरोपही रवी राणा यांनी कुणाचे नाव न घेता यावेळी केलाय.

मात्र त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्याकडे तर नाही ना,

असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

भाजप नेत्यांनी आपआपल्या परीने सगळ्यांनी काम केलेत, त्यांचे आभार मानतो.

महायुतीमध्ये बच्चू कडू नव्हते.

मात्र, आता लोकं खोके, वसुली, हा सगळा हिशोब मागणार आहे.

चोऱ्या करणे, वसुली करणे, पैसे घेऊन राजकारण करणे इत्यादिसह मला काय काय मागणी झाली,

प्रहारचा उमेदवार कसा उभा केला, कुठून वसुली केली,

याचे सगळं हिशोब माझ्याकडे आहे.

पुढे अमरावतीत मुस्लिम समाजाचा आमदार होईल अशी स्थिती आहे.

या तोडीबाजाचा हिशोब अचलपूरची जनता घेईल.

असा इशाराही आमदार रवी राणा यांनी

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना देत हे आरोप केले आहेत.

Read also: भाजपने महाराष्ट्रासह चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले ! (ajinkyabharat.com)

Related News