गुवाहाटी : राज्यामध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. अवघ्या एका महिन्यामध्ये मतदान होणार असून राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु असून प्रचाराचा धडाका उडाला आहे. राज्यामध्ये बंडखोरीचं राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुवाहाटी वारी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.
एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन झाल्यापूर्वी बंडेखोरीवेळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर राज्यामध्ये येऊन भाजपाच्या साथीने त्यांनी सरकार स्थापन केले. तसेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आम्ही सत्तास्थापन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांसह पुन्हा गुवाहाटी जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा गुवाहाटी जात कामाख्या देवींचं दर्शन घेतलं आहे.
Related News
Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे; विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट!
Maharashtra Cabinet Decisi...
Continue reading
भोरमधील सबस्टेशन प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा – सुप्रिया सुळे
भर पावसात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा
Continue reading
आमदारांना कार, इंधन, ड्रायव्हरसाठी दरमहा 75 हजार; मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय ...
Continue reading
‘आमचा अजेंडा खुर्ची नव्हे, तर…’; एकनाथ शिंदेंचे विरोधकांवर टीकेचे बाण, म्हणाले ‘आम्ही फेस टू फेस वाले’
आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना...
Continue reading
जयंत पाटील काय निर्णय घेतील, लवकरच कळेल; शिंदे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचे सूचक वक्तव्य, राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण
जयंत पाटील काय न...
Continue reading
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमानंतर काही तासांतच १० रुपयांच्या चहाच्या पैशांवरून चहाविक...
Continue reading
अकोल्यातील विद्यार्थिनीला दोन वेगवेगळे Percentile; प्रवेश प्रक्रियेवर संकट
एकाच विद्यार्थिनीला 2 पर्सेंटाईल : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा...
Continue reading
देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याच्या चर्चांवर पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बीबीस...
Continue reading
राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार उपस्थित, रोहित पवार गैरहजर
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत घडामोडींना वेग आल्याची चर्च...
Continue reading
Sharad Pawar : फाईव्ह स्टार हॉटेलमधील बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा; शरद पवार मोठा निर्णय घेणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडीं...
Continue reading
गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी आता कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर झाली असून लवकरच दुसरी यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यामध्ये महायुती मोठ्या ताकदीने आणि जल्लोषात विजयी होणार आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये व्यक्त केला आहे.