भारतीय वंशाचे उद्योगपती पंकज ओसवाल यांची 26 वर्षांची मुलगी वसुंधरा ओसवाल मागील काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहे. वसुंधरा ओसवाल हिला युगांडा पोलिसांनी अटक केली असुन ती सध्या युगांडाच्या तुरुंगात बंदिस्त आहे. मुलीच्या अटकेनंतर पंकज यांनी युगांडाच्या राष्ट्रपतींना पत्र लिहिलं, संयुक्त राष्ट्राकडेही यांनी मुलीच्या सुटकेची विनंती केली मात्र अद्यापही वसुंधराची तुरुंगातून सुटका करण्यात आलेली नाही.
वसुंधरा ओसवाल ही प्रसिद्ध बिसनेसमॅन पंकज आणि राधिका ओसवाल यांची मुलगी आहे. वसुंधरा वडिलांच्या कंपनीत काम करत असून ती कंपनीचा युगांडातील संपूर्ण कारभार पाहतेमाहितीनुसार, 1 ऑक्टोबर रोजी वसुंधरा युगांडाच्या एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कहोल प्लांटच्या दौऱ्यावर होती. त्यावेळी काही शस्त्रधारी लोकांनी तिला अटक केली. पंकज ओसवाल यांच्या दाव्यानुसार, हे शस्त्रधारी स्वतःचा पोलीस अधिकारी सांगतात मात्र यावेळी त्यांच्याकडे अटकेचं कोणतंही वॉरंट नव्हतं
Related News
सत्य शंकर यांच्या यशाची प्रेरक कहाणी : व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मोठे भांडवल किंवा उच्च शिक्षणच आवश्यक असते असे नाही. योग्य वेळी योग्य संधी ओळखून त्यावर मेहनतीने काम केले, तर साम...
Continue reading
गुजरातच्या इतिहासातील 7 धक्कादायक सत्य! जूही चावलाच्या सासरच्यांनी आर्थिक संकटात सरकारला कशी दिली मोठी मदत?
बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला ही केवळ आपल्या अभिनयामुळेच नव्हे तर तिच्या...
Continue reading
‘Anupamaa’ February 17 Update: मीता राजा आणि परीला सांगते की आता कुटुंब सुरू करा; अनुपमा राही-प्रीमच्या निर्णयावर ठाम
टीव्ही मालिकेतील रसिक प्रेक्षकांसाठी ‘Anupamaa’ च्या17 फेब्रु...
Continue reading
अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार आणि लिंगवाचक गुन्ह्यांमध्ये सामील असलेला जेफ्री Epstein Files पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने २०२५ मध्ये जेफ्री ...
Continue reading
रियाद : सऊदी अरेबियात भारतीय प्रवाश्यांना घेऊन जाणारी बस भयानक अपघाताची शिकार झाली आहे. हा अपघात सोमवारी रात्री घडला, जेव्हा मक्का येथून मदीनेकडे उमराहच्या तीर्थयात्रेला निघालेली...
Continue reading
🇺🇸 लठ्ठ आणि मधुमेहींना अमेरिकेत प्रवेश नाही!
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा धक्कादायक निर्णय — H-1B आणि ग्रीन कार्ड नियमांमध्ये नवे वादळ
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प...
Continue reading
मुंबईची प्रगती मराठी माणसाच्या थडग्यावर…; राज ठाकरेंचा खरमरीत टोला
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अदानी पॉवर प्रकल्पावरून मनसे अध्यक्षांचा सरकारला इशारा
महाराष्ट्राच्या राजक...
Continue reading
एकट्या जून महिन्यात 1.9 लाखांहून अधिक खात्यांवर घातली बंदीइलॉन मस्क संचालित X मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने26 मे ते 25 जून दरम्यान भारतात 1,94,053 खात्यांवर बंदी घातली आहे.
...
Continue reading
वसुंधरा यांना भेटण्याची कुटुंबियांना परवानगी नाही. वसुंधराच्या अटकेनंतर तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. युगांडाच्या तुरुंगात वसुंधराला टॉर्चर केले जात असल्याचा आरोप पंकज ओसवाल यांनी केला आहे. 90 तासाहून अधिक काळ वसुंधरा हिला एका कोंदट खोलीत ठेवण्यात आलं. तिथे तिला खाण्या-पिण्यास दिले जात नाही. तसेच बाथरूमची अवस्थाही अतिशय घाण आहे. वसुंधराला खोट्या आरोपाखाली अटक केल्याचा दावा पंकज यांच्याकडून करण्यात आला आहे
ओसवाल यांच्या युगांडातील घरातून एका कर्मचाऱ्याने किमती सामानाची चोरी केली. त्याने ओसवाल कुटुंबाच्या नावावर 2,00,000 डॉलर्सचे कर्जदेखील घेतले होते. हे प्रकार उघडकीस आल्यावर या कर्मचाऱ्याने वसुंधरावर खोटे आरोप लावले असे पंकज ओसवाल यांनी सांगितले.