प्रवर्तन संचालनालयाने (ED) सोमवारी मोठी कारवाई करत दिवंगत अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबाविरोधात मोठा फास आवळला आहे. फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने सुमारे 700.27 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. यामध्ये मुंबईतील वरळी भागातील तीन आलिशान इमारती आणि दुबईतील 14 रिअल इस्टेट मालमत्तांचा समावेश आहे. ही कारवाई मिर्ची कुटुंबासाठी मोठा धक्का मानली जात आहे.
ईडीच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये वरळीतील ‘राबिया मॅन्शन’, ‘मरियम लॉज’ आणि ‘सी व्ह्यू’ या तीन प्रमुख इमारतींचा समावेश आहे. या मालमत्तांची किंमत सुमारे 497 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय दुबईतील ‘हॉटेल मिडवेस्ट अपार्टमेंट’सह 14 रिअल इस्टेट युनिट्सही जप्त करण्यात आले आहेत, ज्यांची किंमत अंदाजे 203.27 कोटी रुपये आहे. या सर्व मालमत्ता इक्बाल मिर्चीचा मुलगा आसिफ मेमन आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर होत्या.
इक्बाल मोहम्मद मेमन उर्फ इक्बाल मिर्चीविरोधात मुंबई पोलिसांनी 1994 मध्ये मरीन ड्राईव्ह, यलो गेट, भायखळा आणि अंमली पदार्थविरोधी पथकात अनेक गुन्हे दाखल केले होते. याच प्रकरणांच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला. तपासात असे समोर आले की, मिर्चीने ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि बेकायदेशीर शस्त्रांच्या व्यापारातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा कमावला होता. हा पैसा त्याने आपल्या कुटुंबीयांच्या आणि विविध कंपन्यांच्या नावावर रिअल इस्टेटमध्ये गुंतवला होता.
Related News
५ हजार जणांना परवानगी द्या; अटींचे पालन करू, Manoj Jarange Patil यांच्या सहकाऱ्याचा मुंबई पोलिसांना अर्ज
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jar...
Continue reading
‘Madhuri’ हत्तीणीची अखेर घरवापसी! उपचारानंतर कोल्हापुरात परतताच अनंत अंबानी ‘X’वर ट्रेंड; नेटकऱ्यांनी मानले आभार
कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याची आणि भावनिक नातं असलेली हत्तीण ‘
Continue reading
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण...
Continue reading
क्राकाटाऊ ज्वालामुखीजवळ गेलेली स्पीडबोट बेपत्ता; 5 पत्रकारांसह 8 जणांचा शोध सुरू
इंडोनेशियातील सक्रिय अनाक क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या
Continue reading
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 202...
Continue reading
तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्याने सिमकार्ड घेतलंय का? घरबसल्या तपासा; अनोळखी नंबर आढळल्यास करा ही कारवाई
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक ना...
Continue reading
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा डबल झटका! दूध आणि ऑटो-टॅक्सी प्रवास महागणार; सप्टेंबरपासून खर्च वाढण्याची शक्यता
सप्टेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांच्या घ...
Continue reading
Mumbai : मुंबईत हुंडा छळाच्या तक्रारींमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ; मात्र हुंडाबळी आणि आत्महत्यांमध्ये मोठी घट
Mumbai : मुंबईत विवाहित महिलांच्या हुंड्यासा...
Continue reading
16 वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचं धक्कादायक कृत्य; पाठीमागून हात पकडला, जबरदस्तीने मिठी मारल्याचा आरोप
मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर...
Continue reading
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! टॉयलेटजवळ भाजी, काळे पडलेले पनीर; हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई
राज्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशास...
Continue reading
माज, दादागिरी तुमच्या राज्यात..; मराठी भाषेचा विरोध करणाऱ्यांवर भडकला मराठमोळा अभिनेता
Mumbai Auto Driver Dispute : महाराष्ट्रातील ...
Continue reading
मुंबईकरांसाठी मोठा धक्का! BEST कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत उपोषण; बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता
मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बृहन्मुंबई विद्...
Continue reading
1986 मध्ये वरळीतील या मालमत्ता ‘सर मोहम्मद युसूफ ट्रस्ट’कडून अवघ्या 6.50 लाख रुपयांना खरेदी करण्यात आल्या होत्या. कागदपत्रांमध्ये मालकी हक्क ट्रस्टचा दाखवण्यात आला होता, मात्र प्रत्यक्ष नियंत्रण मिर्ची कुटुंबाकडेच होते. ईडीने असा दावाही केला आहे की, यापूर्वी न्यायालयाची दिशाभूल करून या मालमत्ता सोडवून घेण्यात आल्या होत्या. आसिफ मेमन, जुनैद मेमन आणि हाजरा मेमन यांना यापूर्वीच न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/cockroach-janata-partys-explosive-rise-24-lakhs-of-young-peoples-tremendous-support/