अकोट, दि. 15: अकोट शहरातील कपडे व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अजीम इनामदार यांचे पुतण्या,
डॉ. अब्दुल हसन इनामदार यांना कॅम्ब्रिज डिजिटल विद्यापीठाचा ‘स्कॉलर ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
11 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील भव्य कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेते विंदू दारा सिंग आणि पद्मश्री जितेंद्र सिंह
Related News
मूर्तिजापूरमध्ये बेपत्ता इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला
Metro Pillar Collapse Mumbai : भीषण Power Crash! मेट्रो स्लॅब कोसळून 4 जखमी – सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्न
सांगली जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप! शिंदे-आजित पवार गट महाविकास आघाडीशी युतीच्या मार्गावर
आशियात तणाव वाढला : चीन–जपान संघर्ष उकळतोय!
दररोज 2–3 कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका 20% कमी? नवा अभ्यास देतो धक्कादायक सत्य!
‘The 50’ : रिअॅलिटी शो म्हणजे स्वतःला सिद्ध करणं नाही; अनुभव घेणं आहे – रिद्धी डोगरा
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप प्रेमफुल!
शेट्टी यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. डॉ. अब्दुल हसन इनामदार हे मूळचे महाराष्ट्रातील अकोट शहरातील रहिवासी असून,
त्यांच्या विविध उल्लेखनीय कामगिरीमुळे ते ‘पुरस्कारपुरुष’ म्हणून ओळखले जातात. डिजिटल क्षेत्रात 280 हून अधिक
प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या डॉ. इनामदार यांचे नाव 2022 मध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, यूकेमध्ये नोंदवले गेले.
डॉ. इनामदार यांच्या उपलब्धी:
- 2023 मध्ये उत्कृष्ट उर्दू अदीब पुरस्कार प्राप्त.
- भागवत गीतामध्ये जागतिक सुवर्णपदक विजेते.
- ट्रिपल ग्रॅज्युएशन, डबल मास्टर आणि पीएचडी धारक.
- सुपर हिरो डब्ल्यूएचओ पुरस्कार सन्मानित.
डॉ. इनामदार यांनी त्यांच्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रांमध्ये आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यांच्या योगदानामुळे
त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सन्मान मिळाले आहेत.
अकोट शहरात आणि सर्व स्तरावरून त्यांच्या यशाचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ते
आगामी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/positive-step-towards-export-growth-of-small-industries-first-parcel-sent-to-america-from-akola-post-office-export-center/

