मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील दर्यापूर मार्गावरील उड्डाण पुलाखाली गुरुवारी (दि. ३ एप्रिल)
दुपारी एका ३० वर्षीय युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
अक्षय सुनीलराव देशमुख (वय ३०, रा. जामठी बु.) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
Related News
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;
IPL 2025 : प्लेऑफसाठी ‘करो या मरो’ सामना, मुंबई विरुद्ध दिल्ली…
ई-पासपोर्टची सुरुवात भारतात : प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार,
मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती
संभळ जामा मशिदीच्या सर्वे प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका;
भारतभरात पाकिस्तानसाठी काम करणारे गुप्तहेर उघड!
‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधिमंडळापासून ममता यांची तुटवड;
Jammu-Kashmir: शोपियांमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक:
उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर;
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर रेल्वे पोल क्रमांक ६२१/९ ते ६२२
दरम्यान गाडी क्रमांक १२८३३ डाऊन अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस समोर उडी घेऊन त्याने आपले जीवन संपवले.
अक्षय नुकताच रेल्वे ए.सी. कोच अटेंडंट म्हणून नागपूर येथे कंत्राटी पद्धतीने नोकरीस लागला होता.
गुरुवारी दुपारी २ वाजता त्याचे वडील सुनील देशमुख यांनी त्याला रेल्वे स्थानकावर सोडले होते.
मात्र काही वेळातच अपघाताची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
अक्षयचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते आणि त्याला अवघ्या एक महिन्याचा मुलगा आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट होता.
तसेच, काही दिवसांपूर्वी शासनाने त्यांच्या दाताळा येथील शेतातील पिकांवर आणि राहत्या
घरावर बुलडोझर चालवला होता. या तणावातूनच अक्षयने टोकाचे पाऊल उचलल्याचा
प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.