यवतमाळ | प्रतिनिधी —
शहरातील उष्णतेच्या कडाक्यामुळे आज एक धक्कादायक घटना घडली.
चंद्रपूरकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या क्रूझर गाडीने आज बुधवार,
Related News
23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता शनी मंदिर चौकात अचानक पेट घेतला.
मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
यवतमाळ शहराचे तापमान आज 44 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले होते.
अशातच बाहेर जिल्ह्यातील एक क्रूझर गाडी चंद्रपूरकडे प्रवासी घेऊन जात
असताना शनी मंदिर चौकात गाडीने अचानक पेट घेतला.
चालकाने प्रसंग ओळखत तात्काळ गाडी थांबवली व सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
यावेळी गाडीच्या इंजिनमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले होते आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली.
पाणी आणि फायर एक्सटिंग्विशर च्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच चालकाच्या सतर्कतेमुळे गाडीचे देखील फारसे नुकसान झाले नाही.
या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ दिला नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-terrorist-hallyachaya-prohibition/
