Santosh Deshmukh Murder Case : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख
हत्या प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. अशातच धाराशिवमध्ये एका महिलेचा मतृदेह सापडला.
या मृत महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबध असल्याचा दावा सोशल मिडियावर करण्यात आला.
Related News
व्यस्त आठवड्यात झटपट बनवा पारंपरिक राजस्थानी पापडची भाजी; चव, परंपरा आणि सोपेपणाचा अनोखा संगम
व्यस्त दिवसांसाठी झटपट पापडची भाज...
Continue reading
IMD चा मोठा इशारा! मान्सूनचा तडाखा वाढणार; मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने अनेक राज्यांना अलर्ट
IMD चा मोठा इशारा! पुढील 96 तास मुसळधार प...
Continue reading
Ladki Bahin Yojana तील पात्र महिलांना मोठा दिलासा? बच्चू कडूंचा सरकारला 30 जूनपर्यंत अल्टिमेटम
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री Lad...
Continue reading
राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची लॉटरी? मोदी मंत्रिमंडळ विस्तारात पंजाबच्या दोन मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत
राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची संधी? मोदी सर...
Continue reading
वजनापलीकडील धोका! दीर्घकालीन सूज कशी बिघडवते यकृत, हृदय आणि रक्तातील साखरेचे आरोग्य?
मधुमेह, फॅटी लिव्हर आणि हृदयविकार यांसारख्या आजारांबाबत चर्चा झाली की बहुतेक वेळा लक्ष शरीराच्...
Continue reading
ITR Filing 2026: आयकर रिटर्न भरण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा; चुका टाळा आणि रिफंड लवकर मिळवा
आर्थिक वर्ष 2025-26 साठी आणि मूल्यांकन वर्ष (AY) 2026-27 साठी आयकर रिटर्न (
Continue reading
अन्न पॅकिंगसाठी वर्तमानपत्रांचा वापर थांबवा; FSSAI ची कडक सूचना
FSSAI ची कडक सूचना : रस्त्यावरील खाद्यपदार्थांपासून ते छोट्या हॉटेलांपर्यं...
Continue reading
फक्त कपड्यांपुरतेच नाही! अॅक्सेसरीजमधूनही करा कलर ब्लॉकिंगचा स्टायलिश प्रयोग
कलर ब्लॉकिंगचा नवा ट्रेंड : फॅशनमध्ये रंगांचा खेळ नेह...
Continue reading
मानसशास्त्र सांगते: संभाषणातील ही एक सवय नकळत लोकांना तुमच्यापासून दूर करते
मानसशास्त्र सांगते : काही सवयी अशा असतात ज्या नातेसंबंधांमध्ये ...
Continue reading
'Hai Jawani Toh Ishq Hona Hai'ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी; दोन दिवसांत केवळ 23 कोटींची कमाई
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा बहुचर्चित रोमँटिक-कॉमेडी चित्रपट '
Continue reading
"महिला भूक भागवण्यासाठी नव्हे, तर भावनिक आधारासाठी खातात"; Shefali Shah यांचे भावनिक खाण्यावर भाष्य
बॉलिवूड अभिनेत्री Shefali Shah यांनी नुकतेच म...
Continue reading
'Peddi'चा बॉक्स ऑफिसवर धडाका कायम! तिसऱ्या दिवशीही कोट्यवधींची कमाई; 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेशाची तयारी
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतीक्षित चित्रपट '
Continue reading
धाराशिवमध्ये मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा खरचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी
संबध आहे का? याबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरांमध्ये गेल्या चार दिवसांपूर्वी मनीषा बिडवे या महिलेचा
घरात मृतदेह आढळून आला होता. ही महिला कळंब शहरातील एका कॉलनीमध्ये एकटीच राहत होती.
घराच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याने शेजारी व पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला
असता या महिलेचा घरात मृतदेह आढळून आला. ही महिला बीड जिल्ह्यातील रहिवाशी असून मागच्या
अनेक वर्षापासून ती कळंब शहरात राहते आहे. या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी
संबंध असल्याचा काही पोस्ट बीड जिल्ह्यामध्ये समाज माध्यमावर झळकल्या होत्या.
पोलिसांनी या अनुषंगाने तसा तपास देखील केला मात्र या महिलेचा या घटनेची
काही एक संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितला आहे. या महिलेच्या मृतदेहाचं शव विच्छेदन
करण्यात आलं असून त्याचा अहवाल अद्याप पर्यंत प्राप्त झालेला नाही.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही आत्महत्या की हत्या होती हे स्पष्ट होणार आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींची किंवा या घटनेशी या
महिलेचा काही एक संबंध नाही असं कळंब पोलिसांचं म्हणणं आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या संदर्भात एक पोस्ट केली
असून या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संबंध असल्याचं सुचित केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट केलेल्या
धाराशिवमधील महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही
संबंध नसल्याचं धाराशिव पोलिसांनी स्पष्ट केलंय.