उन्हाळ्यात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फ्रीजचा आपल्या काही चुकांमुळे ब्लास्ट होऊ शकतो.
चला या कोणत्या चुका आहेत ते जाणून घेऊयात.
फ्रीज वापरताना अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे, अन्यथा फ्रीजचा स्फोट होऊ शकतो.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
चला फ्रीज वापरताना कोणत्या 5 चुका करू नयेत.
फ्रीज कंप्रेसर व्यवस्थित थंड होण्यासाठी हवेचा योग्य प्रवाह असणे आवश्यक आहे.
फ्रीज एखाद्या भिंतीजवळ ठेवल्यास किंवा बंद जागेत ठेवल्यास, कॉम्प्रेसर जास्त गरम होऊन स्फोट होऊ शकतो.
फ्रीज भिंतीपासून कमीत कमी 6-8 इंच दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्याभोवती हवा फिरू द्या. फ्रीज भिंतीजवळ ठेवू नका.
फ्रिज योग्य व्होल्टेजवर चालवण्यासाठी स्थिर वीज पुरवठा आवश्यक आहे.
खराब वायरिंग, लूज कनेक्शन असल्यास स्पार्किंग आणि शॉर्ट सर्किट होऊ शकते,
ज्यामुळे फ्रीजचा स्फोट होऊ शकतो. हे टाळण्यासाठी वायरिंगची वेळोवेळी तपासणी करून
घ्या आणि खराब वायरिंग आणि स्वस्त वायरिंगचा वापर टाळा.
तुमच्या भागात व्होल्टेज चढउतार किंवा समस्या असल्यास, त्यामुळे फ्रीज खराब होऊ शकतो किंवा स्फोट होऊ शकतो.
हे टाळण्यासाठी तुम्ही व्होल्टेज स्टॅबिलायझर वापरू शकता.
फ्रीजमध्ये जास्त सामान ठेवल्यास फ्रीजच्या कॉम्प्रेसरवरचा भार वाढतो.
अशा परिस्थितीत, कॉम्प्रेसर जास्त गरम होऊ शकतो आणि जास्त गरम झाल्यामुळे स्फोट होऊ शकतो.
अशा परिस्थितीत फ्रिजमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू ठेवणे टाळावे.
कॉम्प्रेसर हा फ्रीजचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, जर फ्रीज खूप जुना असेल
किंवा कंप्रेसर सतत ओव्हरलोड असेल तर तो जास्त गरम होऊन स्फोट होऊ शकतो.
जर फ्रीज खूप जुना असेल (10+ वर्षांपेक्षा जास्त), तर तुम्ही नवीन फ्रीज घेण्याचा विचार करू शकता.
याशिवाय कंप्रेसरची वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घ्या.