Santosh Deshmukh Murder Case : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख
हत्या प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. अशातच धाराशिवमध्ये एका महिलेचा मतृदेह सापडला.
या मृत महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबध असल्याचा दावा सोशल मिडियावर करण्यात आला.
Related News
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
सातपुड्याच्या पायथ्याशी हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर; शेतकऱ्यांची दहशत
तुमचे वैयक्तिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावे?
सासरी आलेल्या महिलेचं घर जाळून टाकल्याची घटना विचित्र प्रकारे घडली आहे,
सावरा येथे भीषण आग; दोन जनावरांचा मृत्यू, घराची राख
धाराशिवमध्ये मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा खरचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी
संबध आहे का? याबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरांमध्ये गेल्या चार दिवसांपूर्वी मनीषा बिडवे या महिलेचा
घरात मृतदेह आढळून आला होता. ही महिला कळंब शहरातील एका कॉलनीमध्ये एकटीच राहत होती.
घराच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याने शेजारी व पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला
असता या महिलेचा घरात मृतदेह आढळून आला. ही महिला बीड जिल्ह्यातील रहिवाशी असून मागच्या
अनेक वर्षापासून ती कळंब शहरात राहते आहे. या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी
संबंध असल्याचा काही पोस्ट बीड जिल्ह्यामध्ये समाज माध्यमावर झळकल्या होत्या.
पोलिसांनी या अनुषंगाने तसा तपास देखील केला मात्र या महिलेचा या घटनेची
काही एक संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितला आहे. या महिलेच्या मृतदेहाचं शव विच्छेदन
करण्यात आलं असून त्याचा अहवाल अद्याप पर्यंत प्राप्त झालेला नाही.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही आत्महत्या की हत्या होती हे स्पष्ट होणार आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींची किंवा या घटनेशी या
महिलेचा काही एक संबंध नाही असं कळंब पोलिसांचं म्हणणं आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या संदर्भात एक पोस्ट केली
असून या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संबंध असल्याचं सुचित केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट केलेल्या
धाराशिवमधील महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही
संबंध नसल्याचं धाराशिव पोलिसांनी स्पष्ट केलंय.