खाकी वर्दीतील देवमाणूस : ३१ वर्षांची निस्वार्थ सेवा संपली

खाकी

बाळापूर : अकोला वाहतूक शाखेतील ‘खाकी वर्दीतील देवमाणूस’  म्हणून ओळखले जाणारे  किशोर पाटील साहेब आज महाराष्ट्र पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाले. तब्बल ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी आपली प्रामाणिकता, शिस्त आणि माणुसकीने भरलेली सेवा यासाठी पोलीस दलात तसेच नागरिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.

उरळ पोलीस ठाण्यात दोन ते तीन वर्षे ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करत असताना त्यांनी गरजू आणि गरीब नागरिकांना शक्य ती मदत केली. ड्युटीवर असतानाही त्यांचा स्वभाव नेहमी नम्र आणि सहकार्यशील राहिला.

कोरोना काळात जेव्हा अनेकजण पाण्यासाठीही त्रस्त होते, त्या काळात पाटील साहेबांनी नागरिकांना पाणी आणि अन्नाची व्यवस्था करून दिली. कोणाला पाणी पाजले, तर कोणाला आपल्या डब्यातील अन्नही वाटले — म्हणूनच लोक त्यांना ‘खाकी वर्दीतील देवमाणूस’ म्हणून ओळखतात.

Related News

त्यांनी जिथे जिथे काम केले, त्या प्रत्येक ठिकाणच्या नागरिकांकडून त्यांना आज सेवानिवृत्तीच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. निंबा फाटा चौकात कोरोना काळातील त्यांची सेवा अजूनही लोक विसरलेले नाहीत.

पाटील साहेब हे खऱ्या अर्थाने पोलीस दलातील अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व आहेत — कर्तव्यनिष्ठ, नम्र आणि जनतेच्या सेवेसाठी तत्पर.

akolapolice.gov.in

read also : https://ajinkyabharat.com/vanchit-bahujan-aghadi-sabha-at-barshitkali/

Related News