देऊळगाव माळीतील सर्जनाने 42 वर्षीय महिलेला दिले जीवनदान, पोटातून काढली 6 किलो वजनाची गाठ

देऊळगाव माळी

देऊळगाव माळी (ता. मेहकर) येथील डॉ. अविनाश सुरूशे यांनी संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 42 वर्षीय महिलेस पोटातून 6 किलो वजनाची गाठ काढून जीवनदान दिले.

देऊळगाव माळी (ता. मेहकर) येथील सुपुत्र व जालना येथील संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले सर्जन डॉ. अविनाश सुरूशे यांनी एक अत्यंत कठीण आणि जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत 42 वर्षीय महिलेला जीवनदान दिले आहे.

सदर महिला गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पोटदुखीने त्रस्त होती. विविध रुग्णालयांत उपचार करूनही आराम न मिळाल्याने शेवटी नातेवाईकांनी तिला जालन्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणीनंतर सोनोग्राफीमध्ये गर्भपिशवीजवळ मोठ्या आकाराची गाठ आढळून आली, जी तिच्या वेदनांचे मुख्य कारण ठरत होती.

Related News

डॉक्टरांनी सर्व आवश्यक तपासण्या केल्यानंतर शस्त्रक्रियेचा धाडसी निर्णय घेतला. हॉस्पिटलचे संचालक सर्जन डॉ. बळीराम बागल यांच्या नेतृत्वाखाली सर्जन डॉ. अविनाश सुरूशे, भुलतज्ज्ञ डॉ. आनंद देशमुख आणि संपूर्ण वैद्यकीय टीमने तब्बल तीन तासांची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या शस्त्रक्रियेत महिलेच्या पोटातून तब्बल सहा किलो वजनाची गाठ काढण्यात आली.

सध्या महिला पूर्णपणे ठणठणीत असून तिची प्रकृती सुधारली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या टीमचे कौतुक सर्वत्र होत आहे.

या प्रकरणामुळे स्थानिक तसेच जिल्हा पातळीवर आरोग्यसेवा आणि सर्जरीतल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांमध्ये वाढली आहे. डॉ. अविनाश सुरूशे आणि संजीवनी हॉस्पिटलच्या टीमच्या धाडसपूर्ण आणि कुशल कामगिरीमुळे महिला पुन्हा सामान्य जीवनाकडे परतू शकली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/world-famous-lonar-sarovar-water-level-increased-tremendously-kamalja-devichan-temple-15-feet-water-empty/

Related News