‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!

‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!

नवी दिल्ली | प्रतिनिधी

पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या

युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Related News

आता ज्योतीचं एक छायाचित्र समोर आलं असून ती सरगोधा (पाकिस्तान) येथे पाकिस्तान एअर फोर्सच्या अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत दिसत आहे.

 सरगोधा भेटीदरम्यान गुप्त संबंधांचा आरोप

हरियाणातील हिसारची रहिवासी आणि ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचा युट्यूब चॅनल चालवणाऱ्या

ज्योती मल्होत्रानं दोनदा पाकिस्तानला भेट दिली होती. तिचं पाकिस्तानी

अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांबरोबरचं संपर्क समोर येताच गुप्तचर यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

 ‘डॉक्टर यात्रे’सह इतर युट्यूबर्सचा कनेक्शन

ज्योतीसोबत ‘डॉक्टर यात्री’ नावाच्या युट्यूबरचे फोटोही समोर आले आहेत.

‘डॉक्टर यात्री’ हा युट्यूबर मागील वर्षी दिल्लीतील पाक दूतावासाच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमात सहभागी झाला होता.

त्याचप्रमाणे गुरुग्रामचा युट्यूबर मनु मेहतासोबतही ज्योतीचे संबंध समोर आले आहेत.

दोघांचे एकत्र फोटो व्हायरल झाले आहेत. पाकिस्तान दूतावासात त्यांची भेट झाली होती, असंही तपासात समोर आलंय.

 प्रियंका सेनापती नावाच्या प्रवासी ब्लॉगरसोबतही संबंध

ओडिशाच्या पुरीची प्रियंका सेनापती या युट्यूबरसोबतही ज्योतीचे अनेक प्रवास झाले असून ती केरल,

पहलगाम व पाकिस्तानमध्ये तिच्यासोबत गेली होती. दोघींचे अनेक व्ह्लॉग्स आणि फोटो एकत्र पाहायला मिळत आहेत.

 पाकिस्तान दूतावासातील ‘दानिश’शी संबंध, भारतातून हकालपट्टी

ज्योतीनं पाकिस्तानच्या व्हिसासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिली होती.

तिथं तिची भेट ‘एहसान-उर-रहीम उर्फ दानिश’ या अधिकाऱ्याशी झाली होती.
या भेटीचं व्हिडिओ देखील तिनं युट्यूबवर टाकलं होतं.

याच दानिशला भारत सरकारनं 13 मे रोजी ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित करून देश सोडण्याचे आदेश दिले होते.

 गंभीर आरोप: लष्करी गोपनीय माहिती पाकिस्तानला?

ज्योती मल्होत्रावर आरोप आहे की तिनं भारतातील संवेदनशील आणि लष्करी माहिती पाकिस्तानला पुरवली.

यासाठी तिला सोशल मीडिया नेटवर्क आणि प्रवासाच्या बहाण्याने संपर्क मिळवण्याचा वापर केल्याचा आरोप आहे.

  • युट्यूबवर: 3.77 लाख सब्स्क्राइबर्स

  • इंस्टाग्रामवर: 1.32 लाख फॉलोअर्स

  • फेसबुकवर: 3.21 लाख फॉलोअर्स

 सध्या ज्योती मल्होत्रा एनआयएच्या ताब्यात असून, तिच्या सोशल नेटवर्क,

व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आणि प्रवासविवरणांची बारकाईने चौकशी सुरू आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoor-representative-mamta-yanchi-tutwad/

Related News