मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 चे छत कोसळले

दिल्ली

सर्व उड्डाणे रद्द; एक ठार, सहा जखमी

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर

आज सकाळी मोठा अपघात झाला.

Related News

विमानतळाच्या टर्मिनल-1 वर पावसामुळे छत कोसळल्याने

मोठा अपघात झाला.

या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून

बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत

आणि चेक-इन काउंटर बंद करण्यात आले आहेत.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू IGI विमानतळावर पोहोचले आहेत.

सखोल चौकशी केल्यानंतरच उद्यापासून टर्मिनल वन सुरू करण्यात येईल,

असे नागरी उड्डाण मंत्री म्हणाले.

सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची

भरपाई जाहीर केली आहे.

त्याचबरोबर जखमींना तीन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणाले,

‘मुसळधार पावसामुळे विमानतळाबाहेरील छताचा काही भाग कोसळला आहे.

या दुःखद घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती आम्ही शोक व्यक्त करतो,

तसेच चार जण जखमी झाले आहेत.

त्यामुळे आम्ही सध्या त्यांची काळजी घेत आहोत.

आम्ही तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद दल,

अग्निसुरक्षा दल आणि सीआयएसएफ, एनडीआरएफची टीम पाठवली.

सर्वजण घटनास्थळी हजर होते आणि त्यांनी कसून पाहणी केली

जेणेकरून आणखी कोणतीही जीवितहानी होणार नाही.

त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

टर्मिनलची उर्वरित इमारत बंद करण्यात आली असून यापुढे कोणताही

अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व गोष्टींची कसून तपासणी केली जात आहे.

दिल्ली विमानतळ दुर्घटनेवरून राजकारण सुरू झाले आहे.

काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर हल्लाबोल केला आहे.

विमानतळाचे छत कोसळल्याप्रकरणी काँग्रेसने भाजप सरकारला धारेवर धरले आहे.

तर सरकारनेही पलटवार करत यूपीए सरकारच्या काळात बांधल्याचं म्हटलं आहे.

नागरी उड्डाण मंत्री म्हणाले की, ज्या ठिकाणी हा अपघात झाला ती जागा 2009 मध्ये बांधण्यात आली होती.

Related News