मरणातही जर सन्मान नसेल, तर जिवंतपणी न्यायाची अपेक्षा कशी करायची?”

मरणातही जर सन्मान नसेल, तर जिवंतपणी न्यायाची अपेक्षा कशी करायची?"

मुर्तीजापूर तालुक्यातील हिरपूर गावात आज एक अत्यंत क्लेषदायक चित्र समोर आलं –

नाल्याच्या घाण पाण्यातून अंत्ययात्रा. उन्हाळ्याच्या कडक उन्हातही गावकऱ्यांच्या संतापाचा पारा

अधिकच उंचावला. कारण मृताच्या सन्मानासाठीच नव्हे, तर माणुसकीच्या नावानेही प्रशासनाने कानाडोळा केला आहे.

Related News

गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता म्हणजे अपमानाचं जिवंत उदाहरण आहे.

ना पायवाट, ना सांडपाण्याचा बंदोबस्त. त्यामुळे अंत्ययात्रा काढताना गावकऱ्यांना घाण पाण्यातून वाट काढावी लागते.

मृताच्या कुटुंबासाठी ही एक दुहेरी शिक्षा ठरते – एकीकडे आप्तजनाच्या निधनाचं दु:ख आणि दुसरीकडे त्या अंतिम संस्कारासाठी होणारी अवहेलना.

एक ज्येष्ठ ग्रामस्थ म्हणाले –

“एवढे वर्ष झाले, प्रशासन बदलले, पदाधिकारी बदलले… पण स्मशानभूमीचा प्रश्न मात्र तसाच आहे.

आम्हाला ना रस्ता, ना पाणी, ना वीज. फक्त आश्वासनं मिळतात.”

महिलांनीही आपला आवाज ठामपणे उठवला –

“जेव्हा पुरुषही या रस्त्यावरून जायला घाबरतात, तेव्हा आम्हा महिलांची काय अवस्था होत असेल?”

आज सकाळी गजानन पंदेकर यांचे हृदयविकाराने निधन झाले.

अंत्यसंस्कारासाठी त्यांची अंत्ययात्रा जेव्हा नाल्यातून जावी लागली,

तेव्हा गावातील प्रत्येक डोळा पाणावला… पण हे अश्रू केवळ शोकाचे नव्हते – ते अपमानाचे होते.

प्रश्न एवढाच आहे – गावकऱ्यांच्या मृत्यूनंतरही जर सन्मान नसेल,

तर लोकशाहीत ‘जनतेचा राजा’ असलेल्या माणसाला न्याय कधी मिळणार?

हिरपूरच्या या दुःखाला आणि संतापाला उत्तर फक्त विकासात नाही – तर जबाबदारी स्वीकारण्यात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/passo-badhel-kasamapurat-chorratyancha-admission/

Related News