कोविड योद्धा कुटुंबियांना एक कोटी रुपये -सीएम आतिशी

दिल्ली सरकार कोरोना महामारीदरम्यान आपला जीव गमावलेल्या

पाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये देणार आहे.

मुख्यमंत्री अतिशी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी

Related News

दिल्ली सरकारने कोरोना महामारीत जीव गमावलेल्या 92

जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती.

कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर संकट होते –

यावेळी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, दिल्लीतील

लोकांनी कोरोना महामारीदरम्यान आपल्या जीवाची परवा न

करता, मानवता आणि समाजाच्या रक्षणासाठी काम केले आणि

बलिदान दिले. दिल्ली सरकार त्यांना सॅल्यूट करते. या रकमेने

मृतांच्या कुटुंबीयांचे झालेले नुकसान नक्कीच भरून निघू शकत

नाही. मात्र, यामुळे त्यांना सन्मानाचे जगण्यासाठी नक्कीच मदत

होऊ शकते. कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर

संकट होते. “या संकटाने सर्वांच्याच मात दहशत निर्माण केली

होती. मात्र, आपले डॉक्टर, मेडिकल स्टाफ, सहायक स्टाफ आणि

स्वच्छता कर्मचाऱ्यांसह हजारो लोकांनी रात्रंदिवस काम करून या

महामारीचा सामना करण्याचे काम केले. यात अनेकांना आपला

जीवही गमवावा लागला. सरकार या लोकांच्या कुटुंबीयांसह

नेहमीच खांद्याला खांदा लावून उभे आहे,” असेही आतिशी

म्हणाल्या.

Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-modi-will-give-11000-crores-gift-to-maharashtra-today/

Related News