देशातील पहिली वंदे भारत मेट्रो धावण्यासाठी सज्ज !

मेट्रो आणि

मेट्रो आणि वंदे भारत एक्स्प्रेस या दोन्हींचे मिश्रण

भारतीय रेल्वेने वंदे भारत मेट्रोची चाचणी सुरू केली असून

ती लवकरच पूर्ण होणार आहे. यानंतर ही प्रीमियम ट्रेन

Related News

सर्वसामान्यांना प्रवासासाठी उपलब्ध होईल. सध्या सर्वसामान्यांच्या मनात

अनेक प्रश्न निर्माण होत असतील, तर जाणून घेऊया देशाच्या पहिल्या

वंदे मेट्रोची खासियत काय आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,

वंदे भारत मेट्रो ही मेट्रो आणि वंदे भारत एक्सप्रेस या दोन्हींचे मिश्रण आहे.

सध्या ५२ वंदे भारत एक्सप्रेस यशस्वीपणे चालवल्या जात आहेत.

या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे १०० किमी. ने सध्याच्या वंदे भारत पेक्षा कमी वेळेत वेग पकडेल.

म्हणजेच त्याचा पिकअप वेळ आणखी कमी झाला आहे.

सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसला शून्यावरून १०० किमीचा वेग गाठण्यासाठी ५

२ सेकंद लागतात, पण या देशाच्या नवीन वंदे भारत मेट्रोची रचना

अशा प्रकारे करण्यात आली आहे की ती ४५ ते ४७ सेकंदात

शून्यावरून १०० किमीचा वेग गाठू शकते.

मात्र त्याचा कमाल वेग सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा कमी ठेवण्यात आला आहे.

सध्या त्याचा वेग १८० किमी आहे. वंदे भारत मेट्रोचा वेग १३० किमी प्रति तास आहे.

कारण वंदे भारत मेट्रोची स्थानके एकमेकांच्या जवळ असतील, जास्त वेग राखण्याची गरज भासणार नाही.

Read also: https://ajinkyabharat.com/14th-august-1st-week-of-passage-mokala/

Related News