लाडकी बहीण : याचिका फेटाळली
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जाहीर केली.
या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसादही मिळाला.
Related News
चार्जिंगची चिंता संपणार? REEV तंत्रज्ञान बदलणार EV ची दुनिया!
EV मध्ये पेट्रोलचा ‘बॅकअप’ : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंद...
Continue reading
Singapore च्या पंतप्रधानांच्या पगारात घसघशीत वाढ! वार्षिक वेतन 27 कोटींच्या घरात; PM मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पगार किती?
Si...
Continue reading
Bigg Boss 20: तिसऱ्याच दिवशी घरात राडा, चार स्पर्धक नॉमिनेट; बादशाहबद्दल ईशाने काय सांगितलं?
‘Bigg Boss 20 ’च्या घरात आता खऱ्या अर्थाने ड्रामा सु...
Continue reading
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी आणि फोटोग्राफरचे विमान झ्युरिकला डायव्हर्ट; तांत्रिक बिघाडामुळे सहा अधिकारी अडकले
महाराष्ट्राचे उप...
Continue reading
मोठी बातमी! जरांगेंच्या प्रश्नांवर आज निर्णायक तोडगा? संभाजीनगरात तातडीची बैठक; राज्यभर मराठा समाज आक्रमक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Ja...
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा महासंकट! पुरानंतर काठमांडू हादरले; ५.० तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती
Nepal : आधी विध्वंसक पूर आणि भूस्खलनाच्या संकटातून सावर...
Continue reading
डॉलरला पर्याय? भारत-रशिया व्यापारात रुपया-रूबलचा वाढता वापर; अमेरिकेच्या वर्चस्वाला मोठे आव्हान
भारत-रशिया : भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीपूर्ण...
Continue reading
देशातील सर्वात मोठी बँक 12हजार कर्मचारी भरणार; 250 नव्या शाखा उभारणार
बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी; क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये होणार भरती
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल...
Continue reading
इंडोनेशियात ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; 50 हजार फूट उंचीवर राख, 200 हून अधिक उड्डाणे रद्द
इंडोनेशियात प्रसिद्ध अनाक क...
Continue reading
भारत-बेल्जियम संबंध : पाकिस्तानबाबत बेल्जियमचे भारताला महत्त्वाचे आश्वासन?
संरक्षण सहकार्याबाबत चर्चेला उधाण; पाकिस्तानला लष्करी साहित्य न देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती
भारत आ...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा हाहाकार? चौलानी नदीवर भूस्खलनामुळे महापुराचा धोका
जलप्रलयानंतर आणखी मोठा हायअलर्ट; नदीचा प्रवाह बाधित, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश
Continue reading
जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी
आपले नाव नोंदवले आहे. लाडकी बहीण योजनेविरोधात
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती,
ती याचिका आता न्यायालयाने फेटाळली आहे.
त्यामुळे आता १४ ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या
पहिल्या हफ्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका
दाखल करण्यात आली होती. या याचिकेत १४ ऑगस्टला वितरीत करण्यात
येणारा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी
करण्यात आली होती. आज मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर
तातडीची सुनावणी झाली. या सुनावणीत सरकारी धोरणात हस्तक्षेप करण्यास
न्यायालयाने नकार दिला आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारनं
बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय, त्याला आव्हान कसं देता येईल?
असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केला आहे.
नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली होती.
काय होती याचिका ?
लाडकी बहीण योजना म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे.
विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरु केली आहे.
ही भ्रष्ट कृती असून हा मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे.
निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते.
मात्र, सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू नसल्यामुळे
निवडणूक आयोग कारवाई करु शकत नाही, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/on-what-basis-were-77-castes-given-obc-status/