मुर्तीजापुर | प्रतिनिधी
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताचे मन सुन्न झाले आहे.
निष्पाप पर्यटकांच्या हत्येने देश हादरला असून, या रक्तरंजित घटनेनंतर मुर्तीजापुरात संतापाचा ज्वालामुखी फुटला.
Related News
निवासी वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा आरोप….
🇮🇳 पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट; पाकिस्तानात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत चर्चेला उधाण
मलेरियाचा धोका कायम! महाराष्ट्रात पुन्हा वाढले रुग्ण; लक्षणं, कारणं आणि खबरदारी जाणून घ्या
अतिरेक्यांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिला जीव
हृदयद्रावक घटना! ७ वर्षांनी झालेलं बाळ
कारवाईचे संकेत! भारत 7 दिवसांत पाकिस्तानवर मोठा वार करू शकतो….
उष्णतेचा चटका!
पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट
श्रीनगरमध्ये अडकलेल्या अकोल्याच्या सहा नागरिकांना परत
पहलगाम हल्ल्याचा मोठा परिणाम:
मरणातही जर सन्मान नसेल, तर जिवंतपणी न्यायाची अपेक्षा कशी करायची?”
पळसो बढेतील कासमपुरात चोरट्यांचा प्रवेश;
शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेकडो नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक घटकांनी एकत्र येत
पाकिस्तानच्या आणि दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
“पाकिस्तान मुर्दाबाद!”, “दहशतवादाचा नाश झाला पाहिजे!”, “भारत माता की जय!” – अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
उपस्थितांनी हातात फलक, छातीवर देशभक्ती आणि डोळ्यांत अश्रू घेऊन हल्ल्यात बळी गेलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
“आता निषेध पुरे – आता कृती हवी!”
मुर्तीजापुरातून उठलेला हा आवाज फक्त निषेधाचा नाही,
तर निर्णायक कारवाईची जोरदार मागणी करणारा आहे.
व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक भावनांनी म्हणाले,
“देशाच्या सीमांना शब्दांनी नव्हे, तर निर्णायक कृतीने सुरक्षित ठेवलं पाहिजे.”
प्रा. दीपक जोशी आणि ज्ञानेश्वर देशपांडे यांचे मत –
“हे हल्ले आता असह्य झाले आहेत. सरकारने आता केवळ खंडन न करता, कठोर भूमिका घेतली पाहिजे. देश एकवटला आहे!”
तरुण नेते हर्षल साबळे यांनी ठाम शब्दांत सांगितले –
“आम्ही सहन करणार नाही. शत्रूला प्रत्युत्तर दिल्याशिवाय मागे हटणार नाही!”
एकजूट, ज्वाला आणि जबाबदारी
आजचा दिवस मुर्तीजापुरासाठी केवळ संताप व्यक्त करण्याचा नव्हता –
तर तो शांततेच्या नावाने उद्भवलेल्या अश्रूंचा आणि लढ्याच्या निर्धाराचा साक्षीदार ठरला.
देश आज एकच प्रश्न विचारतोय –
“आता बस्स! दहशतवाद संपवाच!”
Read Also : https://ajinkyabharat.com/death-must-be-done-by-us/