बचपन का प्यार, तिचं लग्न ठरलं, हा अस्वस्थ झाला, ती शेवटचं भेटायचं म्हणून आली; दोघांनी कोल्ड्रिक्सही घेतलं, वादाला सुरुवात होताच..

बचपन का प्यार, तिचं लग्न ठरलं, हा अस्वस्थ झाला, ती शेवटचं भेटायचं म्हणून आली; दोघांनी कोल्ड्रिक्सही घेतलं, वादाला सुरुवात होताच..

राहुल पाटण्यातील पाटलीपुत्र येथील सीमेज कॉलेजमधून बीसीएचे शिक्षण घेत होता. कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा होता. तरसुरभी हाजीपूरच्या जमुनीलाल कॉलेजमध्ये शिकत होती.

सुरभी आणि राहुल लहानपणापासूनचे मित्र होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीचे लग्न कुटुंबीयांनी निश्चित केले होते. लग्न एप्रिलमध्ये होणार होते.

घरात लग्नाची तयारी सुरू होती. बीसीए शिकत असलेल्या राहुलला याबाबत माहिती मिळताच तो संतापला होता. सुमारे दोन महिने तो त्याच्या गावी राहत होता.

Related News

राहुलने शुक्रवारी वडिलांना कॉलेजला जायचे असल्याचे सांगितले. यानंतर तो सुरभीसह हाजीपूरहून घाट क्रमांक 93 वर पोहोचला. त्या ठिकाणी भेटण्यासाठी अर्पिता सुद्धा पोहोचली होती.

काही वेळ दोघे बसले. कोल्ड्रीक्स सुद्धा घेतलं. काही वेळानंतर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. यावेळी राहुलने सोबत आणलेल्या गावठी कट्टा काढत अर्पिताला गतप्राण केले.

त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली. या घटनेनंतर पाटणा शहरात एकच खळबळ उडाली. दिघा येथील जनार्दन घाटात प्रेयसीवर गोळी झाडल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळी झाडली.

दोघांचा जागीच मृत्यू झाला. एप्रिलमध्ये कुटुंबीयांनी मुलीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवले होते. त्यामुळे राहुल रागात होता.

राहुल (24, रा. नंदे नगर, लखनौर पोलीस स्टेशन, मधुबनी) असे या तरुणाचे नाव आहे. अर्पिता उर्फ ​​सुरभी (20) असे या तरुणीचे नाव आहे, ती वैशालीच्या काझीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील धरहरा येथे राहणारी आहे.

घाट क्रमांक 93 जवळील चेंजिंग रूमच्या पायऱ्यांवर रक्ताने माखलेले दोन्ही मृतदेह पडले होते. गोळी लागल्याने मुलगी पायऱ्यांवरून खाली कोसळली.

राहुलचा मृतदेह पायऱ्यांवर पडलेला होता. मुलीच्या नाकाजवळ गोळी झाडण्यात आली. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

वडिलांना कॉलेजला जायचे असल्याचे सांगितले

राहुल पाटण्यातील पाटलीपुत्र येथील सीमेज कॉलेजमधून बीसीएचे शिक्षण घेत होता. कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा होता. तर सुरभी हाजीपूरच्या जमुनीलाल कॉलेजमध्ये शिकत होती.

वडिलांनी सांगितले की, राहुलने एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे बोलला होता. तिला तिच्याशी लग्न करायचे आहे, असे सांगितले होता.

मी त्याला सांगितल की तुला हवं तिच्याशी लग्न कर. मला काही अडचण नाही. राहुलने शुक्रवारी वडिलांना कॉलेजला जायचे असल्याचे सांगितले.

यानंतर तो सुरभीसह हाजीपूरहून घाट क्रमांक 93 वर पोहोचला. काही वेळ बसल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर ही घटना घडली

मुलीच्या कुटुंबीयांनी प्रेमसंबंध नाकारले

मुलीचा भाऊ सौरभने बहिणीचे प्रेमसंबंध नाकारले आहेत. तो म्हणाला की, ‘अफेअरबद्दल कोणतीही माहिती नव्हती. शुक्रवारी सकाळी बहीण कॉलेजला येत असल्याचे सांगून निघून गेली होती,

ती पाटण्याला कशी आली याबाबत माहिती नाही. मुलीचे वडील विभूती सिंह यांचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले. राहुल हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मुलीला एक बहीण आणि एक भाऊ आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, मुलाने स्वतःवर गोळी झाडली

घटनास्थळासमोरच दोन महिला आणि एक तरुण गंगेत मासेमारी करत होते. एका महिलेने सांगितले की, ‘आम्ही एका तरुणाला एका मुलीसोबत पायऱ्यांवर बसलेले पाहिले.

दोघे भांडत होते. हे या भागात आपण रोज पाहतो. आम्हीही आमच्या कामात व्यस्त झालो. तेवढ्यात बंदुकीचा आवाज आला. मी मागे वळून पाहिले तर मुलगी पायऱ्यांवरून खाली पडली होती.

तिला काही समजण्यापूर्वीच तरुणाने बॅग उघडून काहीतरी बाहेर काढले आणि नंतर मंदिरातच स्वतःवर गोळी झाडली. गोळी झाडताच चेंगराचेंगरी झाली.

सगळे धावू लागले. घटनास्थळी एक पिस्तूल, एक बॅग आणि जिवंत काडतुसे सापडली.

घटनास्थळावरून पोलिसांनी एक पिस्तूल, पिस्तुलात अडकवलेले काडतूस, बाहेर पडलेले काडतूस, राहुलची बॅग, जिवंत काडतुसे, राहुलचे आधारकार्ड, कॉलेजचे ओळखपत्र आणि दोघांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत.

Related News