मुख्यमंत्र्यांची लेक दिवीजा दहावीत चमकली

मुख्यमंत्र्यांची लेक दिवीजा दहावीत चमकली! इंटरनॅशनल बोर्डात मिळवले 92.60% गुण

मुंबई | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिवीजा फडणवीस हिने 10 वीच्या इंटरनॅशनल बोर्ड

परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून यश मिळवलं आहे. ही माहिती तिची आई आणि प्रसिद्ध गायिका

Related News

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे.

 गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर दुहेरी आनंद

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश करताना फडणवीस कुटुंबाला दुहेरी आनंद मिळाला.

एकीकडे गृहप्रवेश, तर दुसरीकडे दिवीजाच्या यशस्वी निकालामुळे आनंदाचे वातावरण होते.

 ‘सागर’वरून ‘वर्षा’कडे – परीक्षेच्या काळात जुन्याच घरी राहिले फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की, मुलीच्या परीक्षेमुळे ते वर्षा बंगल्यावर रहायला गेले नव्हते.

“दिवीजाची परीक्षा असल्याने मी जुन्याच सागर बंगल्यावर राहिलो.

आता गृहप्रवेश केला,” असं फडणवीस यांनी याआधी सांगितलं होतं.

 मुंबईच्या प्रतिष्ठित शाळेतून शिक्षण

दिवीजा फडणवीस ही मुंबईतील फोर्ट परिसरातील ‘द कैथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल’ मध्ये शिकत आहे.

इंटरनॅशनल बोर्डाची परीक्षा देत तिने 92.60% गुण मिळवले.

 अमृता फडणवीस यांचा आनंद

“आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा निवासस्थानी छोटीशी पूजा केली आणि गृहप्रवेश केला.

दिवीजाच्या निकालामुळे आम्हाला फार आनंद झाला,” असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

दिवीजाच्या यशाबद्दल सोशल मीडियावरून अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढत कुटुंबासाठी केलेला हा निर्णय आणि विद्यार्थिनी म्हणून दिवीजाचं यश अनेक पालकांसाठी प्रेरणादायक ठरू शकतं.

Read Also : https://ajinkyabharat.com/29-october-mumbai/

Related News