मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना : लाडक्या बहिणींनो खुशखबर!

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना : लाडक्या बहिणींनो खुशखबर!

मुंबई | प्रतिनिधी

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांसाठी आजपासून मोठी आनंददायक बातमी समोर आली आहे.

एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून,

Related News

अनेक महिलांच्या खात्यात ₹1500 रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘आज येईल, उद्या येईल’ अशा आशेवर असलेल्या लाडक्या बहिणींना अखेर

एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी आपल्या बँक खात्याची तत्काळ तपासणी करावी,

कारण तुमची रक्कम आधीच जमा झालेली असण्याची शक्यता आहे.

मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम

राज्य सरकारने एप्रिल महिन्याचा हप्ता जमा केल्यानंतर, आता महिलांना मे महिन्याच्या हप्त्याची उत्सुकता लागली आहे.

सध्या तरी मे महिन्याच्या रकमेबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही, मात्र लवकरच ती रक्कमही खात्यात जमा होणार असल्याचे संकेत आहेत.

लाडकी बहीण योजनेची माहिती थोडक्यात

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून,

महिला सक्षमीकरण आणि आर्थिक मदतीसाठी सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत निवडक पात्र महिलांना दरमहा ठराविक आर्थिक मदत दिली जाते.

Read Also : https://ajinkyabharat.com/pakistanla-international-level-motha/

Related News