इस्लामाबाद | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर,
पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि घबराट पसरली आहे. भारताने प्रत्यक्ष युद्धाची घोषणा केलेली नसली तरी आर्थिक,
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उचललेल्या पावलांमुळे पाकिस्तान भयभीत अवस्थेत पोहोचला आहे.
भारताकडून कठोर कारवाया सुरू झाल्याने पाकिस्तानला “कधीही युद्ध होऊ शकते” अशी धास्ती वाटत असून,
आता तो आपल्या मित्र राष्ट्रांकडे मदतीसाठी हात पसरू लागला आहे.
सौदी अरब, यूएई, कुवैतकडे मदतीची याचना
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सौदी अरब,
संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि कुवैतच्या राजदूतांची भेट घेतली आहे.
यावेळी त्यांनी भारतावर “तणाव कमी करण्यासाठी दबाव टाकण्याची” विनंती केली आहे.
पाकिस्तानकडून मित्र देशांना सांगितले जात आहे की, भारत आक्रमक पावले उचलत आहे
आणि परिस्थिती अधिक तणावपूर्ण होत चालली आहे. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी भारतात हस्तक्षेप करावा,
असा आग्रह पाकिस्तानकडून केला जात आहे.
भारताकडून अद्याप शांत परंतु ठाम भूमिका
भारताने अद्याप प्रत्यक्ष युद्धाची घोषणा केली नसली तरी, पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राला फटका देणाऱ्या आणि व्यापारी
संबंध थांबवणाऱ्या निर्णयांमुळे पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढती प्रतिमा आणि कणखर भूमिका यामुळे पाकिस्तान आणखीनच दबावात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chief-minister-ladki-bahin-yojana-ladkya-bahini/