मुख्यमंत्रीपदी कोणी बसला म्हणजे शहाणा ठरत नाही; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विचार करावा.

फडणवीस यांचा राष्ट्रीय अभ्यास कमी – संजय राऊत यांचा घणाघात

दिल्ली निवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“मुख्यमंत्री झालं म्हणजे शहाणा झालो असं नाही. काही भाग्य योग असतात आणि काही

फ्रॉड भाग्य योग असतात. हे सरकार फ्रॉड भाग्य योगाने आलेलं आहे,” अशी टीका त्यांनी केली.

Related News

फडणवीस यांनी राहुल गांधींवर केलेल्या टिकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, “फडणवीस अजून राष्ट्रीय नेते नाहीत.

त्यांचा राष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास कमी आहे.

त्यांनी अभ्यास करावा. जोपर्यंत अमित शाह आहेत, तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल की नाही, याबाबत शंका आहे.”

दिल्लीतील निकाल आधीच ठरलेला होता, असा दावा करत राऊत यांनी सांगितले की,

“फडणवीस प्रचाराला गेले नसते तरी निकाल तोच आला असता.” तसेच, एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करत,

“शिंदे यांची मातोश्री दिल्लीत आहे, त्यांना तिथे रात्रीच जावं लागतं, कारण दिवसा कुणी भेटत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

Related News