मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

मुंबई, ९ मे २०२५ – भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर

राज्यात सज्जता आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पोलिस, गुप्तवार्ता आणि नागरी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

Related News

बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा स्तरावर मॉकड्रिल राबवणे, ब्लॅकआऊट दरम्यान वैद्यकीय

सेवांची सतत उपलब्धता, सायबर सुरक्षा उपाय, जनजागृती मोहीम, सोशल मीडियावर देशविरोधी गतिविधींवर नियंत्रण इत्यादी अनेक महत्त्वाचे निर्देश दिले.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉर रूम’ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून,

आपत्कालीन फंड तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ब्लॅकआऊटच्या काळात रुग्णालयांच्या कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून पर्यायी वीजपुरवठा आणि गडद पडद्यांद्वारे संरक्षणाची सूचना करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर देशविरोधी पोस्ट्स प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले,

तसेच सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे सायबर ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.

सागरी सुरक्षेसाठी फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घेण्याचा निर्णय देखील चर्चेत आला.

Read Also : https://ajinkyabharat.com/extra-then-sasisathi-tayar-raha/

Related News