हेमंत सोरेन यांनी केला सरकार स्थापनेचा दावा!
झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
Related News
बुधवारी रात्री उशिरा चंपाई सोरेन यांनी राजभवनात
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला.
यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी गुलाम अहमद मीर
आणि मंत्री मिथिलेश ठाकूर उपस्थित होते.
त्यानंतर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा हेमंत सोरेन विराजमान होणार आहेत.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील राज्यातील आघाडी सरकारच्या
सर्व आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांना तिसऱ्यांदा झारंखडच्या मुख्यमंत्री करण्याची तयारी केली आहे.
हेमंत सोरेन यांनी जेएमएम, आरजेडी आणि काँग्रेस आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंपाई सोरेन म्हणाले,
मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
हेमंत सोरेन यांची नेतेपदी निवड करण्यात आली
असून लवकरच नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
काही दिवसांपूर्वी मला मुख्यमंत्री करण्यात आले होते.
मला राज्याची जबाबदारी मिळाली होती.
आता हेमंत सोरेन परत आले आहेत.
आघाडीतील पक्षांनी निर्णय घेतला आहे की, हेमंत सोरेने आमचे नेते असतील.
मी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, असे चंपई सोरेन यांनी सांगितले.
राज्यातील या राजकीय घडामोडीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत विसा यांनी एक्स वरून प्रतिक्रिया दिली आहे.
जेएमएम आणि काँग्रेसकडून एका वरिष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्री पदावरून हटवणे चुकीचे आहे.
झारखंडमधील लोक नक्कीच याचा विरोध करतील असे ते म्हणाले.
ईडीने केली होती अटक
हेमंत सोरेन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली होती.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही दिवस आधी
म्हणजे ३१ जानेवारी रोजी अटक होण्याच्या आधी
हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
जवळ जवळ पाच महिन्यांनी २८ जून रोजी त्यांना जामीन मिळाला.
उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
सोरेन यांच्यावर ३१ कोटींहून अधिक किमतीची ८.८६ एकराची जमीन
बेकायदेशीरित्या मिळवल्याचा आरोप आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/akher-samba-sub-division-branch-engineer-andolachenya-bhetila/