छावा या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई यांची भूमिका केली आहे.
मात्र या पात्रासाठी रश्मिका ही पहिली पसंत नव्हती.सध्या देशभरात छावा या चित्रपटाची चर्चा चालू आहे.
या चित्रपटाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. महाराष्ट्रात तर या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतले आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 240 कोटी पेक्षा जास्त पैसे कमवले आहेत.
अजूनही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड चालूच आहे.हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेला आहे.
चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने केली आहे.
तर महाराणी येसुबाई यांची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने केली आहे.रश्मिका मंदानाने केलेल्या
या कामाचे सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. तिने महाराणी येसुबाई यांच्या
पात्राला न्याय दिला आहे, असे म्हटले जात आहे.मात्र महाराणी येसुबाई यांच्या पात्रासाठी रश्मिका मंदाना ही पहिली पसंद नव्हती.
तर या पात्रासाठी बॉलिवुडच्या मोठ्या अभिनेत्रीचा विचार केला जात होता.या अभिनेत्रीचे नाव कतरिना कैफ असे होते.
तशी विचाणाही कतरिनाला झाली होती. मात्र काही कारणांमुळे ती ही भूमिका साकारू शकली नाही
आणि महाराणी येसुबाईंचे पात्र साकारण्याची जबाबदारी रश्मिका मंदानावर आली.
विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पात्रासाठी विकी कौशलच्या अगोदर महेशबाबू या अभिनेत्याचा विचार झाला होता.
मात्र महेशबाबूनेही ही भूमिका साकारण्यात स्वारस्य दाखवलं नाही.
त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका विकी कौशलकडे आली. दरम्यान, विकी कौशल आणि रश्मिका
मंदाना या दोघांनीही त्यांच्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडली.
आजघडीला या दोघांनाही संपूर्ण देशातून भरभरून प्रेम मिळत आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/tuja-bhavani-murthy-sthantarachi-discussion-kya-aay-truth/